२२ डिसेंबरला सर्वांत लहान दिवस, रात्र सर्वांत मोठी!

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 19, 2023 05:11 PM2023-12-19T17:11:06+5:302023-12-19T17:12:08+5:30

या दिवसाला दर वर्षांत थोडा फरक पडू शकतो, अशी माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली.

Shortest day, longest night on December 22! | २२ डिसेंबरला सर्वांत लहान दिवस, रात्र सर्वांत मोठी!

२२ डिसेंबरला सर्वांत लहान दिवस, रात्र सर्वांत मोठी!

अमरावती : २२ डिसेंबरला सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहील या बिंदूला ‘विंटर सोल्स्टाईस’ असे म्हणतात या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वांत लहान व रात्र ही सर्वांत मोठी असते. दिवस हा १०.४७ तासांचा राहील. या दिवसाला दर वर्षांत थोडा फरक पडू शकतो, अशी माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली.

दिवस व रात्रीचा कालावधी कमी-जास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडत असते व याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायान सुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायान सहज लक्षात येते. पृथ्वीवरील ऋतू देखील पृथ्वीच्या कलत्या अक्षामुळे निर्माण होतात.

सर्व खगोलप्रेमींनी या लहान दिवसांचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

सूर्य दक्षिणेकडे जास्त असल्याचा परिणाम

१) आकाशात वैषुविक व आयनिक व या दोन वृत्ताचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. यापैकी एका बिंदूत २३ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो, याला ‘शरद संपात बिंदू’ असे म्हणतात. तर त्याचे विरुद्ध बिंदूत २३ सप्टेंबरला सूर्य प्रवेश करतो. याला शरद संपात बिंदू म्हणतात.

२) या दोन्ही दिवशी दिवस व रात्रीचा कालावधी हा सारखाच असतो. २२ डिसेंबरला सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वांत लहान व रात्र सर्वांत मोठी असते. या दिवसाला ‘हिवाळा अयन दिवस’ देखील म्हणतात.

Web Title: Shortest day, longest night on December 22!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.