२१ डिसेंबरला वर्षातील सर्वांत लहान दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:00 AM2020-12-15T07:00:00+5:302020-12-15T07:00:07+5:30

Amravati News वर्षातील सर्वात लहान दिवस २१ डिसेंबरला १० तास ४७ मिनिटांचा राहणार आहे.

The shortest day of the year next week | २१ डिसेंबरला वर्षातील सर्वांत लहान दिवस

२१ डिसेंबरला वर्षातील सर्वांत लहान दिवस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : वर्षातील सर्वात लहान दिवस २१ डिसेंबरला १० तास ४७ मिनिटांचा राहणार आहे. या दिवशी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहिल. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान व रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवसात दरवर्षाला थोडा फरक पडू शकतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडत असते व याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन आपल्याला अनुभवता येते. २१ डिसेंबरच्या सर्वांत लहान दिवसाला हिवाळा अयन दिवस असेसुद्धा म्हणतात . सर्व खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी सर्वांत लहान दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभाग अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले.

Web Title: The shortest day of the year next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.