नोंदणी न झालेल्या कापसाच्या गाद्या, उशा कराव्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:02+5:30

२२ मार्चच्या टाळेबंदी आदेशानंतर २३ ते ३० एप्रिलपर्यंत कापसाच्या नोंदणी ऑनलाइन कराव्यात, अशी नोटीस काढण्यात आली. त्यानुसार, बाजार समितीत व्यवस्थाही करण्यात आली. कापसाचे भाव वाढतील, या आशेने घरात ठेवलेला कापूस ऑनलाईन नोंदणीकरिता बाहेर काढण्यात आला.

Should unregistered cotton be made into mattresses & cushions? | नोंदणी न झालेल्या कापसाच्या गाद्या, उशा कराव्या का?

नोंदणी न झालेल्या कापसाच्या गाद्या, उशा कराव्या का?

Next
ठळक मुद्देशेतकरी संतापले : ऑनलाइन नोंदणीची अशीही कासवगती

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : कोरोना संक्रमण काळात येथील बाजार समितीत कापसाची ऑनलाईन नोंदणी झाली खरी, मात्र त्यात सुसूत्रता नसल्याने व मर्यादित कालावधीमुळे अनेक जण नोंदणीपासून वंचित राहिले. त्यामुळे आता पुन्हा नोंदणी सुरू करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. नोंदणी न झालेल्या कापसाच्या गाद्या अन् उशा कराव्या का, असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.
२२ मार्चच्या टाळेबंदी आदेशानंतर २३ ते ३० एप्रिलपर्यंत कापसाच्या नोंदणी ऑनलाइन कराव्यात, अशी नोटीस काढण्यात आली. त्यानुसार, बाजार समितीत व्यवस्थाही करण्यात आली. कापसाचे भाव वाढतील, या आशेने घरात ठेवलेला कापूस ऑनलाईन नोंदणीकरिता बाहेर काढण्यात आला. मात्र, अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले. शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी सुरू राहील, ही शासनाची घोषणा आहे. त्याप्रमाणे उर्वरित शेतकऱ्यांकडील कापूस शासनाने खरेदी करावा. कापूस खरेदीची गती वाढवावी, असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रदीप निमकाळे यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पणन महासंघ, जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. यावर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Should unregistered cotton be made into mattresses & cushions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस