बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:51+5:302020-12-24T04:13:51+5:30
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील कामासंदर्भातील शासकीय फाईल्स वरिष्ठांकडे पाठविताना डाकेव्दारे पाठविणे क्रमप्राप्त आहे. परंतु बांधकाम विभागातील नस्त्या ...
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील कामासंदर्भातील शासकीय फाईल्स वरिष्ठांकडे पाठविताना डाकेव्दारे पाठविणे क्रमप्राप्त आहे. परंतु बांधकाम विभागातील नस्त्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे थेट कंत्राटदारच घेऊन येत असल्याची बाब निदर्शनास आल्याने प्रभारी अतिरिक्त सीईओ तुकाराम टेकाळे यांनी बांधकाम विभागावर नियंत्रण नसल्याचा ठप्पका ठेवत कार्यकारी अभियंता यांना २३ डिसेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून १४ तालुक्यांतील विविध गावांत विकासकामे केली जातात. ही कामे करताना कामासंदर्भातील विविध प्रकारच्या प्रशासकीय कामांच्या फायली बांधकाम विभागाकडील प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून त्यानंतर पुढील कारवाईकरिता अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केल्या जातात. मात्र, सदरची प्रशासकीय कामाजाबाबतची कुठलीही फाईल डाकेव्दारे पाठविणे क्रमप्राप्त आहे. परंतु ही प्रक्रिया बाजूला ठेवत कंत्राटदारच स्वत: नस्त्या घेऊन येत असल्याने अतिरिक्त सीईओंनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही बाब खेदजनक असून यासंदर्भात खुलासा सादर करण्याचे आदेश कारणे दाखवा नोटीस व्दारे बांधकामच्या प्रभारी अभियंता नीला वंजारी यांना दिले आहेत. विशेष म्हणजे असे प्रकार पुढे होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे अतिरिक्त सीईओ तुकाराम टेकाळे यांनी सूचित केले आहे.