दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

By admin | Published: April 17, 2015 12:27 AM2015-04-17T00:27:18+5:302015-04-17T00:27:18+5:30

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयाला अनुसरून गुरूवारी जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख

Show cause notice to officials who get stalked | दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

Next

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेत पिठासीन सभापतींच्या सूचना
अमरावती :
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयाला अनुसरून गुरूवारी जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या सभेत आरोग्य, शिक्षण बांधकाम व समाजकल्याण विभागाच्या प्रश्नांवर घमासान झाले. सभेला अध्यक्षांची परवानगी न घेता गैरहजर खातेप्रमुखांवर काय कारवाई करता, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी उपस्थित केला. यावर अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना पिठासीन सभापती सतीश ऊईके यांनी सभेचे सचिव के.एम अहमद यांना दिल्या आहेत. यावेळी सभेत जिल्हा परिषद सदस्यांना सभेचे कार्यवृत्त देताना ठरावाच्या प्रती देण्यात येत नाहीत. यावरून प्रशासनाला स्थायी समिती सदस्यांनी धारेवर धरत जाब विचारला. अखेर प्रशासनाने यावर माघार घेत सदस्यांचा प्रश्न बरोबर आहे. यामध्ये प्रशासनाकडून अनावधानाने चूक झाली. मात्र यापुढील सभेला सभेच्या कार्यवृताच्या प्रति उपलब्ध करून देण्याचे सचिव के.एम अहमद यांनी मान्य केले. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करताना सदस्यांना विश्र्वासात घेतले जात नाही. परिणामी रिक्त जागी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे राहतात. त्यामुळे रिक्त पदे भरली जात नाहीत. यामध्ये अनियमितता होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सुधीर सूर्यवंशी, चित्रा डहाणे, अभिजित ढेपे, प्रताप अभ्यंकर आदी यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर विचारले. मात्र यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर याबाबत पुढील सभेत विस्तृत माहिती देण्याचे चऱ्हाटे यांनी सभागृहात सांगितले. यासोबतच तिवसा पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम मागील ३ वर्षांपासून पूर्ण झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावाईस अशी मागणी सुधीर सूर्यवंशी यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान यासंदर्भात योग्य चौकशी करण्याचे बांधकाम सभापती गिरीश कराळे यांनी सभागृहात सांगितले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सदस्य प्रताप अभ्यंकर, सुधिर सूर्यवंशी, अभिजित ढेपे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अनियमित कामांची होणार चौकशी
अंजनगाव सुर्जी पंचायत समिती मध्ये दलित वस्ती विकास निधीअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कृती आराखडा तयार करून पं.स. कडे पाठविला जातो. परंतु पंचायत समितीस्तरावरून ग्रा.प.ने सुचविलेली कामे न घेता स्वत: नियमबाह्य कामे जिल्हा परिषद स्तरावर पाठविले या प्रकरणी विस्तार अधिकारी पवार आणि ढवळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येवू नये असा प्रश्न स्थायी समिती सभेत उपस्थित करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची सूचना अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी केली. या चौकशी समितीत उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम. अहमक, समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांचा समावेश आहे. दलित वस्तीच्या कामांची देयके बीडीओ भाष्कर रेंगळे यांनी अदा केली नाहीत. त्यामुळे त्यावरही प्रश्नांची सरबत्ती सभागृहात करण्यात आली.

वर्ग जोडले पुढे काय?
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ५ ते ८ याप्रमाणे आरटीई कायद्यानुसार जोडण्यात आले. मात्र इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अद्यापही शिक्षण विभागाने तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, वर्ग जोडले मात्र पुढच्या शिक्षणाचे काय दरम्यान यासंदर्भात सभागृहात ५ ते ८ वी असे वर्ग जोडले परंतु आठवीच्या विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पुरेसे साहित्य, तज्ञ शिक्षक, लेबॉरर्टी, गणित शिक्षक नाही? सध्याही डी.एड. शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. सदस्यांच्या या गंभीर प्रश्नांवर अध्यक्षांनी दखल घेऊन शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना उत्तर देण्याचे सांगितले. यावेळी सदस्यांचे म्हणणे बरोबर असल्याने याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे आश्र्वासन सभागृहात शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Show cause notice to officials who get stalked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.