एका महिन्यात कामाची प्रगती दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:16 PM2017-10-08T23:16:31+5:302017-10-08T23:16:52+5:30

चलपूर या जुळ्या शहरात विकासासाठी निधी दिला असताना अनेक योजना रखडल्या आहेत.

Show progress in one month | एका महिन्यात कामाची प्रगती दाखवा

एका महिन्यात कामाची प्रगती दाखवा

Next
ठळक मुद्देप्रवीण पोटे : निधी असून योजना रखडल्या, अचलपूर पालिकेत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर या जुळ्या शहरात विकासासाठी निधी दिला असताना अनेक योजना रखडल्या आहेत. या योजनेत होणारी दिरंगाई विकासाला अडसर ठरत आहे. अधिकाºयांनी एका महिन्यात प्रगतीचा आढावा द्यावा, अशा सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अचलपूर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत दिल्या.
बैठकीला नगराध्यक्ष सुनीता फिसके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, मुख्याधिकारी प्रदीप जगताप, उपाध्यक्ष शशिकांत जैस्वाल, नगरसेवक सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जुळ्या शहरात पंतप्रधान घरकूल योजनेच्या कामात दिरंगाई, विधवा, अपंगांच्या योजने संदर्भात अधिकाºयांकडून होणारी कुचराई, अमृत योजनेची मंदावलेली गती, शहरातील अतिक्रमण या विषयांवर पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना जाब विचारला. शहरातील अतिक्रमण काढावे, मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्याचे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले. नगरसेवकांच्या विविध समस्यांवर प्रवीण पोटे यांनी आढावा घेतला.
एक महिन्यानंतर जाब विचारणा
जुळ््या शहराच्या विकासासाठी निधी असलेल्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध असताना त्याचा पाठपुरावा सतत करीत कामांना गती देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाºयांना देत पुन्हा जुळ््या शहराच्या विकासकामांना आढावा एक महिन्यानंतर घेणार असल्याचा दम दिला.

Web Title: Show progress in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.