चिखलसावंगी येथे श्रावणबाळ, संजय गांधी योजना आपल्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:58+5:302021-07-22T04:09:58+5:30
मोर्शी : कोरोनाम्या महाभयंकर परिस्थितीत संपूर्ण शासकीय कामे पूर्णतः बंद होती. त्यामुळे नागरिकांना श्रावणबाळ व संजय गांधी योजनांचा ...
मोर्शी : कोरोनाम्या महाभयंकर परिस्थितीत संपूर्ण शासकीय कामे पूर्णतः बंद होती. त्यामुळे नागरिकांना श्रावणबाळ व संजय गांधी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना नाहक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर तोडगा म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात मोर्शी तालुक्यात चिखलसावंगी येथे ‘श्रावणबाळ व संजय गांधी योजना आपल्या दारी‘ या योजनेचा नागरिकांना लाभ मिळण्याकरिता प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण करण्याच्या हेतूने अपंग बांधव, विधवा भगिनींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभ प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून चिखलसावंगी येथील शेकडो नागरिकांनी या योजनेचा लाभ प्राप्त करण्याकरिता अर्ज केलेले आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल तालुक्यातील नागरिकांनी आ. देवेंद्र भुयार यांच्या कार्याचे कौतुक केले.
मोर्शी तालुक्यात आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी गावात अशा प्रकारची योजना राबविली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी आ. देवेंद्र भुयार यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी चिखलसावंगी येथील सरपंचा स्वाती चिखले, मीना इंगळे, उपसरपंच ग्रा.पं.सदस्य वर्षा इंगळे. जयश्री चिखले, गोरखनाथ चिखले, सुभाष खातरकर, सचिन तडस, जि.प.चे माजी सभापती गिरीश कराळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, सुरेंद्रपंत चिखले, नंंदू लेकुरवाडे, राहुल अढाऊ, दिनेश चिखले, सतीश बोरेकर, गोपाल चोपडे, मंगेश इंगळे, राजू राऊत, प्रणित चोपडे, मनोज इंगळे, निरंजन मालपे, आशिष खवले, शंकर पारधी, अमोल इंगळे, किशोर सुर्वे, चेतन लेकुरवाडे व ग्रामसेवक तलाठी आदी उपस्थित होते.