श्रावणी खांडे जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 05:00 AM2022-06-18T05:00:00+5:302022-06-18T05:00:27+5:30
होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९.६० टक्के गुण पटकावले असून, ती दुसऱ्यास्थानी आहे. अंबापेठस्थित मदर्स पेठ स्कूलचा तारक गुल्हाने, तर अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्याशाळेची सुरभी पटेल या तिघांनीही कलागुणांसह ९९.२० टक्के गुण मिळवत जिल्हाभरातून तिसऱ्यास्थानी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, एप्रिल २०२२ या महिन्यात घेण्यातआलेल्या इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन घोषित करण्यात आला. यात येथील होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९.६० टक्के गुण पटकावले असून, ती दुसऱ्यास्थानी आहे. अंबापेठस्थित मदर्स पेठ स्कूलचा तारक गुल्हाने, तर अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्याशाळेची सुरभी पटेल या तिघांनीही कलागुणांसह ९९.२० टक्के गुण मिळवत जिल्हाभरातून तिसऱ्यास्थानी आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच दहावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आपसूकच जे विद्यार्थी हुशार, गुणी होते, ते निकालात झळकले. मात्र, यंदा काही नामांकित शाळांचाही निकाल घसरल्याचे वास्तव आहे.
अमरावती जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्के
यंदा जिल्ह्यात दहावीत उन्हाळी परीक्षेसाठी ३९ हजार १११ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३८ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, ३७ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९६.३९ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात इयत्ता दहावीपर्यंतच्या ७४५ शाळा आहेत. मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारल्याचे टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे.
कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षा
कोरोनानंतर पहिल्यांदाच यंदा दहावीची परीक्षा ऑफलाइन झाली. शिक्षणाचा कंटाळा आलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा नकोशी होती. त्यामुळे नामंवत शाळांचा निकाल घसरला आहे. मात्र, ज्या शाळांनी निकालाची टक्केवारी कायम ठेवण्याचे लक्ष्य होते, ३०८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरू
निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणात येण्याची शक्यता पाहता शिक्षण मंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क केले जाईल.