दर्यापुरातील श्री बालाजी जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:05 PM2019-03-23T23:05:40+5:302019-03-23T23:06:05+5:30

अकोला मार्गावरील श्री बालाजी जिनिंगला शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. यात कापूस व इंजिन साहित्य जळून खाक झाले. तूर्तास या आगीत किती नुकसान झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमनच्या पाच बंबांनी ही आग आटोक्यात आणली.

Shri Balaji Jingala fire at the highway | दर्यापुरातील श्री बालाजी जिनिंगला आग

दर्यापुरातील श्री बालाजी जिनिंगला आग

Next
ठळक मुद्देअग्निशमनचे पाच बंब दाखल : मागील वर्षी तीन वेळा लागली होती आग

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : अकोला मार्गावरील श्री बालाजी जिनिंगला शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. यात कापूस व इंजिन साहित्य जळून खाक झाले. तूर्तास या आगीत किती नुकसान झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमनच्या पाच बंबांनी ही आग आटोक्यात आणली.
जिनिंगच्या आवारातील कापसाच्या गंजीला आग लागल्याची माहिती जिनिंगच्या संचालकांना कळताच त्यांनी त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र काही वेळात मोठा परिसर आगीने कवेत घेतला. त्यामुळे दर्यापूरसह अंजनगाव सुर्जी, मुर्तिजापूर, अचलपूर, अकोट येथून अग्निशमनबंब मागविण्यात आले. धुरामुळे अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आगीचे कारण कळू शकले नाही. काही व्यापारांनी जिनिंगमध्ये कापूस विकण्यासाठी आणला होता. आग लागल्याचे कळताच जिनिंगच्या आवारातून कापसाने भरलेली वाहने बाहेर काढण्यासाठी तारांबळ उडाली.
अग्निशमन व्यवस्थेपासून जीन दूरच
गतवर्षीसुद्धा श्री बालाजी जिनिंगला तीनवेळा आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी प्रशासनाचे लाखो रुपये खर्ची पडले. जिनिंगमध्ये आग लागल्यास ती आग नियंत्रणात आणण्यासाठी स्वत:ची अग्निशमन व्यवस्था असणे अनिवार्य आहे. त्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे. मात्र या जिनिंगमध्ये अग्निशमन तर सोडाच साधी पाण्याचीदेखील व्यवस्थाही नाही.

Web Title: Shri Balaji Jingala fire at the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.