अचलपूर तालुक्यात २४ वर्षीय शुभम खेरडे सर्वात तरुण उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:49+5:302021-01-21T04:13:49+5:30
अचलपूर : सर्वात तरुण उमेदवार म्हणून धोतरखेडा ग्रामपंचायतमध्ये २४ वर्षीय शुभम खेरडे निवडून आले आहेत. विद्यार्थीदशेपासून भारतीय जनता पक्षाशी ...
अचलपूर : सर्वात तरुण उमेदवार म्हणून धोतरखेडा ग्रामपंचायतमध्ये २४ वर्षीय शुभम खेरडे निवडून आले आहेत. विद्यार्थीदशेपासून भारतीय जनता पक्षाशी ते संबंधित आहेत. भाजपक्षांतर्गत जबाबदारी सांभाळतानाचा राजकीय अनुभव आहे. आजोबा काशिनाथ खेरड हे गावपातळीवरील राजकारणात जुन्या पिढीत किंगमेकर राहिले आहेत. काका विलासराव खेरडे यांची इच्छा पूर्ण करण्याकरिता ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहावेसे वाटले. आता काका हयात नाहीत, पण त्यांनी दोनवेळा ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना दोन्ही वेळेस उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम सुरू करताना ज्या ग्रामपंचायत इमारतीत बसून गावविकासाचे निर्णय घेतले जातात, ती इमारत सुसज्ज व मजबूत करून, प्रथम ग्रामपंचायत इमारतीत बदल करणार. तरुणांनी शहराची वाट न धरता गावातच राहावे याकरिता गावात दर्जेदार शिक्षण, युवकांकरिता जीम, वाचनालय आणि गावपातळीवरच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. रोजगारविषयक मार्गदर्शनासह स्पर्धा पररक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन गावातच उपलब्ध व्हावे.