अमरावती विभागातील शुभमला आयटीआयमध्ये पैकीच्या पैकी गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:28+5:302021-07-07T04:14:28+5:30
अमरावती : कारंजा लाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन या व्यवसायाचा विद्यार्थी शुभम भगत याने अखिल ...
अमरावती : कारंजा लाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन या व्यवसायाचा विद्यार्थी शुभम भगत याने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत २०० पैकी २०० गुण घेऊन अव्वल क्रमांक पटकावला आहे. परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत तथा प्राचार्य व पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ट्रेड थेअरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स, एम्प्लॉएबिलिटी स्किल या तीन विषयांचे २०० मार्काचे पेपर ऑनलाईन पद्धतीने, तर ट्रेड प्रॅक्टिकल व इंजिनीअरिंग ड्रॉईंगचे पेपर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आले होते.
अमरावती विभागातून कारंजा लाड येथील अधिकाधिक विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. शुभम भगतने ९६ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक गाठला. श्रीहरी गुंजाटे ९४ टक्के, आकिब शेख व सुनील वडनेरकर ९२ टक्के, तर ९० टक्क्यांवर शुभम वाकडे, रोशन गायकवाड, प्रतीक्षा देशभ्रतार, साक्षी वरठी आदींनी गुण घेतले. व्यवसाय निदेशक कृष्णकुमार चांदेकर यांच्यासह अन्य शिक्षकांनी
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान मानले.