‘रंगीला सरडा’ पडला प्रेमात....!, ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ या नव्या प्रजातीची नोंद

By गणेश वासनिक | Published: May 7, 2023 06:21 PM2023-05-07T18:21:52+5:302023-05-07T18:22:08+5:30

मध्य महाराष्ट्रात दुर्मिळ सरड्याचे दर्शन, अमरावती येथील वन्यजीव प्रेमींच्या कॅमेऱ्यात कैद

 Sighting of a rare lizard in Madhya Maharashtra, caught on camera by a wildlife lover in Amravati | ‘रंगीला सरडा’ पडला प्रेमात....!, ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ या नव्या प्रजातीची नोंद

‘रंगीला सरडा’ पडला प्रेमात....!, ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ या नव्या प्रजातीची नोंद

googlenewsNext

अमरावती : माळराने, शेतीचा परिसर व विरळ मनुष्यवस्ती लगतच्या जंगलात आढळणारा ‘रंगीला सरडा’ सध्या प्रेमात पडला आहे. या सरड्याचे दर्शन नुकतेच अमरावती परिसरातील जंगलात वन्यजीव छायाचित्रकार डॉ. तुषार अंबाडकर, विनय बढे, अमित सोनटक्के आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना झाले आहे. पालीच्या आकाराचा या सरड्याला इंग्रजीमध्ये ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ असे म्हणतात. 

सरडा डेक्कननेनिंस या शास्त्रीय नावाने हा सरडा ओळखला जातो. विणीच्या काळात नर सरड्याचा गळ्याखालचा भाग रंगीत होतो. मादीला आकर्षित करण्यासाठी हा सरडा स्वतःच्या गळ्याखालील पोळे मागे पुढे करून आकर्षित करतो. मादीला मात्र असे रंगीत गळ्याखालील पोळे नसतात, हे विशेष. 

पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्रात याचे दर्शन दुर्मिळ आहे. या सरड्याला ‘निलपंखी सरडा’ नावानेही ओळखले जाते. या सरड्याची लांबी २२ ते २३ सेमी पर्यंत असून आकाराने हा सरडा आकारणे लहान असून लहान कीटक याचे मुख्य खाद्य आहे. या प्रजाती बद्दलचे वर्णन पहिल्यांदा शास्त्रज्ञ जॉर्डन यांनी ई.स. १८७० मध्ये केले आहे. हा सरडा भारतासाठी स्थानविशिष्ट प्रजाती म्हणून जगप्रसिद्ध आहे. या सरड्याचे पृथ्वीवर अस्तित्व २६ लाख वर्षापूर्वी असल्याची नोंद आहे. अमरावती परिसरात या सरड्याच्या दर्शनाने येथील जैवविविधेतेचे महत्व पुन्हा नव्याने अधोरेखित झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
 
जागतिक स्तरावर निलपंखी सरड्यावर संशोधन
जगप्रसिद्ध सरीसृप तज्ञ डॉ. वरद गिरी, डॉ. दीपक वीरप्पन, मोहम्मद असिफ काझी व के. प्रवीण कारंथ यांच्या संशोधनादरम्यान त्यांना हा सरडा पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्रात आलेला नव्हता. त्यांनी संपूर्ण भारतभर तब्बल तीन हजार सहाशे किमी फिरून यावर संशोधन केले आहे. या सरड्याच्या तब्बल पाच नवीन प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत, या पाचही प्रजाती जगासाठी नवीन ठरलेल्या आहेत. 
 
या सरड्याचे दर्शन चकित करणारे आहे. ही नोंद महत्त्वपूर्ण असून या नोंदीसह आजवर अनेक दुर्मिळ प्रजातींचे दर्शन आपल्या भागात झाले आहे. या अनुषंगाने विदर्भातील भूस्थित परिसंस्था व कृषी परिसंस्थाचे संवर्धन होणे गरजेचे वाटते. - यादव तरटे पाटील,​​​ वन्यजीव अभ्यासक, अमरावती
 
या सरड्याचे दर्शन मनाला आनंद देणारे आहे. आम्ही देशी- विदेशी पक्षी छायाचित्रे व वन्यप्राणी टिपण्यासाठी नियमित जात असतो. या सरड्याचे दर्शन आम्हाला प्रेरणा देणारे आहे. - डॉ. तुषार अंबाडकर, वन्यजीव छायाचित्रकार, अमरावती

Web Title:  Sighting of a rare lizard in Madhya Maharashtra, caught on camera by a wildlife lover in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.