पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे दर्यापुरात स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:27+5:302021-07-17T04:11:27+5:30

फोटो - दर्यापूर युथ नावाने दर्यापूर : युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम ...

Signature campaign of Youth Congress in Daryapur against petrol, diesel and gas price hike | पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे दर्यापुरात स्वाक्षरी अभियान

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे दर्यापुरात स्वाक्षरी अभियान

Next

फोटो - दर्यापूर युथ नावाने

दर्यापूर : युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील मुख्य चौकातील पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शहराध्यक्ष ईश्वर बुंदिले, अभिजित देवके, सुनील गावंडे, पंकज मोरे, शिवाजी देशमुख, दत्ता कुंभारकर, नितेश वानखडे, दिलीप चव्हाण, पाखरे, निशिकांत पाखरे,,जगदीश कांबे प्रामुख्याने उपस्थित होते.

160721\img-20210716-wa0017.jpg

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात युवक काँग्रेस चे दर्यापुरात स्वाक्षरी अभियान.....

Web Title: Signature campaign of Youth Congress in Daryapur against petrol, diesel and gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.