सिंधी समाजबांधवांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:37 PM2018-03-31T22:37:54+5:302018-03-31T22:37:54+5:30
दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी सिंधी समाज बांधवांनी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करून दुर्ग येथील पोलिसांनी केलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी सिंधी समाज बांधवांनी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करून दुर्ग येथील पोलिसांनी केलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध नोंदविला.
शुक्रवारी सिंधी समाज बांधवांची रामपुरी कॅम्पमध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. त्यामध्ये अर्धा दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शनिवारी सिंधी समाजबांधवांनी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवले. जयस्तंभ चौकात समाज बांधव एकत्रित झाले होते, त्या ठिकाणी दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तेथून सिंधी समाजबांधव इर्विन चौकात पोहोचले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याल्या मार्लापण करून मोर्चा गर्ल हायस्कूल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी मनीष बजाज, मोहित भोजवानी, बंटी पारवानी, वासुदेव नवलानी, राजु दुर्गई, शंकर ओटवानी, किशन कोटवानी, विजय भुतडा, बिट्टू सलुजा, बालकिसन वसंतवानी, मोहित पोपटानी, चंदुमल रोहना, डेटाराम हरवानी, माणिकचंद लुल्ला, सुनील उदासी, गणेश थावरानी, सनी उदासी, पुरुषोत्तम हरवानी, किसनचंद वसंतवानी, इंदरलाल दिपवानी, महेश पिंजाणी, बाबू गेरवाल, ऋषी खत्री, चंदुमल बिल्दानी, भूषण बनसोड, अनिल पमनानी, जितू मोटवानी, जेठनंद भोजवानी, मनोहर धामेचा, राजकुमार राजदेव, अशोक नानवानी, आशीष मदनानी, गोलू आहुजा, अमर पारवानी, प्रेम थावरानी, रवि आहुजा, सनी दुधवानी, दीपक जयसिंघानिया, सुरेश पतंगवाला, अमल चावला आदी उपस्थित होते.