हिंदू स्मशानभूमीतील तिसरी शवदाहिनीविरूद्ध मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:07+5:302021-05-27T04:13:07+5:30
अडेलतट्टू धोरणाचा बचाव कृती समितीकडून निषेध, ईतर स्मशानात शवदाहिनी लावण्याची मागणी अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ...
अडेलतट्टू धोरणाचा बचाव कृती समितीकडून निषेध, ईतर स्मशानात शवदाहिनी लावण्याची मागणी
अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी लावण्यात येणाऱ्या तिसऱ्या शवदाहिनीविरूद्ध शुक्रवारी परिसर बचाव कृती समितीमार्फत मूक आंदोलन करण्यात आले. ही शवदाहिनी अन्य स्मशानभूमीत लावण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
हिंदू स्मशान संस्थेच्या प्रवेशद्वारावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले. नगरसेवक स्वाती कुळकर्णी, अजय सारसकर, लविना हर्षे, प्रणित सोनी यात प्रामुख्याने उपस्थित होते. कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत असलेल्या हिंदू स्मशान संस्थेवर येणारा अंत्यसंस्कारांचा ताण शहरात असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून या परिसरातील लोकांना होणारा असह्य त्रास कमी करावा या स्मशानावरचा वाढलेला ताण पाहता तिसरी गॅस किंवा विद्युत दाहिनी शहरातील इतर कुठल्या स्मशानात लावून दुसरेही स्मशान विकसित करावे, अशी परिसर बचाव कृती समितीची मागणी आहे.
हाती निषेधाचे फलक घेऊन मूक आंदोलन करण्यात आले. यात दीपक पोच्छी, विशाल कुळकर्णी, जितेंद्र कुरवाणे, किशोर सावळे, रवी लोडम, आशिष जगनाडे, पुंडलिक दुरणे, अरविंद गंगेले,चंद्रशेखर कुळकर्णी, अभय बपोरीकर, श्याम जोशी, जितेंद्र कुरवाणे, गोपाल चांडक, राजेश गुप्ता, हनुमान शेळके, किरण लावरे, मोंन्टु बोरगांवकर, उन्नती शालिग्राम, दिपक पोच्छी, जयेश राजा, अजय टोम्पे, प्रल्हाद चव्हाण, गजानन दाभाडे संजय गोहाड प्रामुख्याने उपस्थित होते.
---------------
कोट-
- आर.बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशानभूमी संस्था
------------------
हिंदू स्मशान संस्थेने आजवर केलेले कार्य प्रशंसनीय आहे. मात्र, स्मशानाची तोकडी जागा, आजूबाजूला घनदाट वस्ती आणि अरुंद रस्ते अशा असंख्य मर्यादा लक्षात न घेता तिसरी दाहिनी लादली जाते आहे. मृतांची स्वर्गाची व्यवस्था उत्तम करताना जीवित लोकांना नरकयातना देण्याचे कार्य केले जाऊ नये.
-शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ते, भाजप