सप्टेंबर महिन्यात एकाचवेळी चार ग्रहांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:14+5:302021-09-04T04:17:14+5:30

अमरावती : सप्टेंबर महिन्यात सूर्यमालेतील चार प्रमुख ग्रह एकत्र पाहण्याची सुवर्णसंधी खगोलप्रेमिंना मिळणार आहे. बुध, शुक्र, गुरू व शनी ...

Simultaneous appearance of four planets in the month of September | सप्टेंबर महिन्यात एकाचवेळी चार ग्रहांचे दर्शन

सप्टेंबर महिन्यात एकाचवेळी चार ग्रहांचे दर्शन

Next

अमरावती : सप्टेंबर महिन्यात सूर्यमालेतील चार प्रमुख ग्रह एकत्र पाहण्याची सुवर्णसंधी खगोलप्रेमिंना मिळणार आहे. बुध, शुक्र, गुरू व शनी हे ग्रह सध्या रात्रीच्या आकाशात आपले तेजोमय दर्शन देताना दिसत आहे. हे चार ग्रह रात्रीच्या वेळी अगदी साध्या डोळ्यांनी पाहू शकताे, असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे.

आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सूर्यास्तानंतर पश्चिम क्षीतिजावर दिसतो. ९ सप्टेंबर रोजी हा ग्रह चंद्राच्या अगदी खाली दिसेल. शुक्र हा ग्रह सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला दिसतो. रात्री ८.३० पर्यंत हा ग्रह दिसतो. हा ग्रह खूप चमकत असल्याने सहज ओळखता येईल. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू सायंकाळी पूर्व दिशेला दिसत आहे. हा ग्रह रात्रभर आकाशात दिसतो. पहाटे पश्चिमेकडे मावळतो. या ग्रहाचे चंद्र व ग्रेट रेड स्पाॅट पाहण्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता आहे. या ग्रहाला एकूण ७९ चंद्र आहे. त्यापैकी यूरोपा, गॅगीमिड, आयो व कॅलोस्टो हे चार चंद्र टेलीस्कोपमधून दिसू शकतात. सूर्यमालेतील सर्वात सुंदर कडी असणारा ग्रह शनि हा सायंकाळी पूर्वेकडे गुुरूच्या बाजूला दिसतो. हा ग्रह रात्रभर आकाशात दिसतो. अगदी साध्या डोळ्यांनी हा पाहता येईल. परंतु या ग्रहाची सुप्रसिद्ध रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. याकरिता टेलीस्कोपची आवश्यकता आहे. या ग्रहाला एकूण ८२ चंद्र आहे. हे सर्व चारही ग्रह खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हाैशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

Web Title: Simultaneous appearance of four planets in the month of September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.