तूर खरेदीच्या मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:12 PM2018-03-20T22:12:08+5:302018-03-20T22:12:08+5:30

Sin is in the measure of purchase of tur | तूर खरेदीच्या मापात पाप

तूर खरेदीच्या मापात पाप

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : सॅम्पलच्या नावावर काढतात किलोभर तुरी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रकार करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रेडरची शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार केल्याने शासकीय खरेदीच्या मापातील पाप उघड झाले आहे.
तूर खरेदीच्या शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात असल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. यंदा जिल्ह्यात डीएमओची नऊ, तर व्हीसीएमएफची तीन अशा बारा केंद्रांद्वारा खरेदी सुरू आहे. ५० किलोच्या काट्यामागे बारदानाच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर ५०० ते ७०० ग्रॅमपर्यंत तूर जास्त घेतली जाते किंवा वजनात कपात केली जाते. वास्तविक, ५० किलोच्या कट्ट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बारदान्याचे वजन ३०० ते ४०० ग्रॅम असते.
तूर खरेदीसाठी अगोदर चाळणी व आता आर्द्रतेचे निकष लावले जात आहेत, शिवाय सॅम्पलच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर गे्रडरद्वारा किमान किलोभर तूर काढली जात आहे. या शेतकऱ्यांना उघडउघड लुटण्याच्या प्रकाराबाबत मस्तवाल अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने नवनवे फंडे पुढे येत आहेत. यासंदर्भात जिल्हा विपणन अधिकारी यांच्या संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही.
ग्रेडिंगमध्येही भरडला जातोय शेतकरी
शासकीय खरेदी केंद्रावर ग्रेडिंगचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या ग्रेडरद्वारा खरेदी केलेली तूर मोजमापानंतर गोदामात ठेवण्यासाठी आणल्यानंतर गोदामावरील अन्य कंपनीच्या ग्रेडरद्वारा अडविली जाते व येथेही पुन्हा सॅम्पलच्या नावावर किलोपेक्षा जास्त तूर काढली जाते व कधीकधी रिजेक्ट केली जाते. विशेष म्हणजे, गोदामावर नाकारलेल्या तुरीचे पेमेंट रोखल्या जाते. या यंत्रणामध्ये समन्वय व सुसंवाद नसल्यामुळे शेतकरी नाहक भरडला जात आहे.
उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदी
नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा (एमएससीएमएफ) तूर खरेदीचा करारनामा झाला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई स्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळे नाफेडद्वारा आधारभूत किमतीने तूर खरेदी होत असली तरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे खरेदीची प्रक्रिया मंदगतीने राबविण्यात येत आहे.
४३ हजार नोंदणी, १४ हजार शेतकऱ्यांची खरेदी
जिल्ह्यातील १२ केंद्रावर सद्यस्थितीत ४३ हजार १८१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असली तरी खरेदी मात्र १४ हजार ५३३ शेतकऱ्यांकडून झालेली आहे. हेक्टरी सरासरी उत्पादकता १२ क्विंटल ग्राह्य धरण्यात आलेली आहे. जिल्ह्यात यंदा १२ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उत्पादकतेच्या २५ टक्के म्हणजेच चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा शासनाचा डाव असल्यामुळे केंद्रांवरील खरेदीची गती मंदावली आहे.

Web Title: Sin is in the measure of purchase of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.