जुन्या पेन्शनसाठी एकवटले शासकीय कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:07 AM2019-09-10T01:07:51+5:302019-09-10T01:08:11+5:30
मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाक्षणिक संप पुरकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील व अन्य शासकीय कार्यालयातील प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुनी पेन्शन योजना सुरू करावी, यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय राज्यव्यापी संप पुकारला. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांनी नेहरू मैदान येथून जिल्हा कचेरीपर्यत आक्रोश मोर्चा काढृून सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला.
मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाक्षणिक संप पुरकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील व अन्य शासकीय कार्यालयातील प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या ११ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा या निवेदनाद्वारे समन्वय समितीच्या पदाधिकारी व कर्मचाºयांनी शासनाला दिला. मोर्चात मोठ्या संख्येने शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.
या संघटनांचा
होता सहभाग
महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक समन्वय समिती (जि.प. खाजगी) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, प्राथमिक शिक्षक समिती, जि.प. लेखा कर्मचारी संघटना, जि.प. आरोग्य कर्मचारी संघटना, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक सेना, शिक्षक समिती यांच्यासह अन्य काही संघटनांचा सहभाग होता.