आरटीओत ‘ट्रायल’साठी एकच हेल्मेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:01:19+5:30

मध्यतंरी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आरटीओत कामकाजासाठी गर्दी नव्हती. परंतु, हल्ली आरटीओत गर्दीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी आरटीओत दुचाकी चाचणीच्या वेळी अनेकांनी वारंवार एकच हेल्मेट परिधान करून वाहन चालविण्याची चाचणी दिली आहे. वाहनांची चाचणी देताना निरीक्षकांकडून योग्य तपासणी होत नाही. ‘दलाल सांगतील तेच बरोबर’ असा कारभार सुरू आहे.

A single helmet for a ‘trial’ at the RTO | आरटीओत ‘ट्रायल’साठी एकच हेल्मेट

आरटीओत ‘ट्रायल’साठी एकच हेल्मेट

Next
ठळक मुद्देहा तर कोरोनाचा प्रसार ! : अधिकाऱ्यांसमोरच ‘या डोक्याती’ल हेल्मेट ‘त्या डोक्यात’

अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन विभागात दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी चालकांना वाहनांची ‘ट्रायल’ द्यावी लागते. आरटीओत संबंधित दलालांकडील एकाच हेल्मेटवर अनेक जणांची वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येत असून, ही बाब कोरोना संसर्ग प्रसाराला पोषक आहे. वाहन निरीक्षक हे केवळ दलालांकडून आलेले अर्ज मंजूर करीत असल्याचे चित्र आहे.
वाहन चालविण्याचा परवाना घेताना अगोदर एक ते सहा महिन्यांपर्यंत शिकाऊ परवाना जारी केला जातो. त्यानंतर दुचाकी चालविण्याचा कायमस्वरूपी परवाना मिळविणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने आरटीओत परवाना मिळविण्यासाठी वाहन चालविण्याची वाहन निरीक्षकांकडून चाचणी घेण्यात येते. वाहन चाचणीच्या वेळी हेल्मेट अनिवार्य असते. मात्र, कोणताही चालक हेल्मेट आणत नाही. त्यामुळे दलालांकडे असलेले एकच हेल्मेट अनेकांना चाचणीच्या वेळी वापरता जात आहे.
मध्यतंरी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आरटीओत कामकाजासाठी गर्दी नव्हती. परंतु, हल्ली आरटीओत गर्दीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी आरटीओत दुचाकी चाचणीच्या वेळी अनेकांनी वारंवार एकच हेल्मेट परिधान करून वाहन चालविण्याची चाचणी दिली आहे. वाहनांची चाचणी देताना निरीक्षकांकडून योग्य तपासणी होत नाही. ‘दलाल सांगतील तेच बरोबर’ असा कारभार सुरू आहे. एकच हेल्मेट अनेकांकडून वापरले जात असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय वाहन चाचणीच्या वेळी नंबर प्लेट, साईड ग्लास आदींची तपासणी होत नसल्याचे वास्तव आहे. तरीदेखील दलालांच्या इशाऱ्यांवर आरटीओत वाहन निरीक्षक परवाना मंजूर करीत असल्याचे चित्र आहे.

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही
आरटीओत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे वास्तव आहे. प्रवेशद्वारापासून तर खिडक्यांवरील कामकाजादरम्यान नागरिकांची रेटारेटी आहे. वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्याच्या स्थळीदेखील हेच चित्र आहे. तोंडावर मास्क नसतानाही आरटीओत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आरटीओतून कोरोना संसर्ग पसरण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: A single helmet for a ‘trial’ at the RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.