लिंगा परिसरात सिंगल फेज योजना बारगळली

By admin | Published: June 2, 2014 12:53 AM2014-06-02T00:53:10+5:302014-06-02T00:53:10+5:30

राज्य विद्युत वितरण कंपनीच्या १३ तासांच्या भारनियमनाला नागरिक त्रस्त झाले

Single phase plan in Linga area | लिंगा परिसरात सिंगल फेज योजना बारगळली

लिंगा परिसरात सिंगल फेज योजना बारगळली

Next

लिंगा : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या १३ तासांच्या भारनियमनाला नागरिक त्रस्त झाले असून परिसरात सिंगल फेज योजना बारगळल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.

तालुक्यातील लिंगा, करवार, जामगाव, महेंद्री, पिपलागढ, करवार, एकलविहीरसह आदी गावे येतात. सदर गाव पंढरी जंगलाला लागूनच असल्याने वनपरिक्षेत्रातून वीजपुरवठा करण्यास परवानगी मिळत नसल्याने सदर गावात अद्यापही सिंगल फेजींग योजना सुरु नसल्याने ग्रामस्थांना १३ तासाच्या विज भारनियमनाचा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे जंगल परिसराच्या बाजूने सुरक्षित ठिकाणावरुन वीज वाहिन्या टाकल्यास या गावांना लाभ मिळू शकत असल्याने वीज वितरण कंपनीने त्वरित सिंगल फेजिंग योनजा सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुसला पंचायत समिती सर्कलप्रमुख संजय श्रीराव यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लिांग परिसरात अनेक आदिवासी गावे आहेत. सातपुड्याचा मोठा जंगल परिसर असून या जंगलात हिंस्त्र पशुसह अनेक प्रकारचे पक्षीसुद्धा वास्तव्य करतात. हजारो हेक्टर जंगल परिसरात बिबट, अस्वलीसह राणडुक्करसुध्दा मोठय़ा प्रमाणात असल्याने या परिसरातील कारली, जामगाव, पिंपलागढ, महेंद्री, पंढरी, करवार, लिंगा, एकलविहीर ही गावे ेयेतात. परंतु सिंगल फेजिंग योजना या भागात कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामस्थसिंह विद्यार्थ्यांना वीज भारनियमनाचा मोठा त्रास सहन करावा लागत असून १३ तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतकर्‍यांच्या ओलिताचा आणि गावातील नागरिकांना पशुपक्ष्यांचा त्रास या सर्व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत माहिती घेतली असता हा परिसर वनाचा असल्याने जंगलातून विद्युत वाहिन्या टाकण्याकरिता परवानगी मिळत नाही; मात्र विद्युत वाहिन्याकरिता जंगल परिसराच्या बाजूने विद्युत तारा टाकण्यात येऊन सदर गावांना सिंगल फेजिंग योजनेचा लाभ हिंस्त्र प्राणी, सर्पदंश तसेच चोर्‍या या घटना घडणार नाहीत. यामुळे त्वरित वनविभाग आणि वीज वितरण कंपनी यांच्यात समन्वय साधून आदिवासी भाग भारनियमनमुक्त करण्यासाठी सिंगल फेजिंग योजना कार्यान्वित करण्यात यावी अन्यथा रायुकाँच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पुसला सर्कलचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसप्रमुख संजय श्रीराव यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Single phase plan in Linga area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.