साहेब; आम्ही गढूळ पाणी प्यायचे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:54+5:302021-05-18T04:12:54+5:30
下खडीमाल载 गावात 下भिषण载 पाणी टंचाई चिखलदरा पंचायत समितीचे दुर्लक्ष मारोती पाटणकर / चुरणी चुरणी -: मानव पाण्याविना कसे जगेल ...
下खडीमाल载 गावात 下भिषण载 पाणी टंचाई
चिखलदरा पंचायत समितीचे दुर्लक्ष
मारोती पाटणकर / चुरणी
चुरणी -: मानव पाण्याविना कसे जगेल पाण्याशिवाय माणसाचे काहीच होत नाही अशाही काळात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमाल गावात पिण्याची पाण्याचा योग सोय नाही गावात एकच विहीर त्यात ही पाणी नाही आणी पाणी थोडा आहे तो ही पाणी गढुळच पाणी येत आहे. त्यामुळे खडीमाल येथील गावकऱ्यांवर गढुळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. खडीमाल गावात पाण्याची टंचाई समस्या कायम आहे ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खडीमाल ग्रामवासी यांनी केला आहे. या गावात सार्वजनिक पिण्याची पाण्याची सोय नाही. गावात आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांच्या समस्या कडे प्रशासन दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधीचे सुध्दा या समस्या कडे पुर्ण पने दुर्लक्ष झाले आहे. खडीमाल गावात पिण्याचे पाण्याचे भिषण टंचाई कडे आता कोण लक्ष देणार. साहेब की आम्ही गढुळ पाणी प्यायचे का???अशा प्रश्न निर्माण होत आहे.
■ टँकरने पाणी पुरवठा करा
मागील काही दिवसापासुन खडीमाल येथे पिण्याची पाण्याची टंचाई आहे या गावात एकमेव विहीर आहे विहीरीचे पाणी आटले आहे तेही गढुळ पाणी येत असल्याने गावातील महीलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण दुरदूर भटकंती करावी लागते गडुढ पाणी पिल्याने आदिवासी लोकाचे आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी टँकर ने पाणी पुरवठा करण्याची मांगणी केली आहे..
■ग्रामपंचायतीने आमच्या सर्व समस्या दूर कराव्या खडीमाल या गावात अनेक समस्या प्रलंबित आहेत आदिवासी समाजाचा फायदा घेवु नये भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल न करता गावकऱ्यांना किमान मुलभुत सुवीधा तरी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावे अशी येथील गावकऱ्यांची मांगणी आहे