तंटामुक्त समितीने पुकारला सरपंच, सचिवाविरुद्ध एल्गार

By admin | Published: January 15, 2015 10:43 PM2015-01-15T22:43:23+5:302015-01-15T22:43:23+5:30

दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करुन येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने सरपंच सचिव यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

Sir-Panchchal Committee, urged against the secretary, Elgar against the secretary | तंटामुक्त समितीने पुकारला सरपंच, सचिवाविरुद्ध एल्गार

तंटामुक्त समितीने पुकारला सरपंच, सचिवाविरुद्ध एल्गार

Next

लेहेगाव (रेल्वे) : दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करुन येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने सरपंच सचिव यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
गावातील एका जागेच्या संदर्भात नामदेव भिकाजी स्वर्गीव यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केला. तो त्यांनी सरपंच रेखा महानकर यांचे पतीकडे दिला व त्यांनी यांना अर्ज प्राप्त झाल्याची प्रतिलिपी दिली. तंटामुक्त समितीने हा मुद्दा उचलून सरपंच रेखा महानकर यांच्या पतीला स्वाक्षरी करण्याचे अधिकार आहेत काय, यावरून वादंग उठले आहे. तंटामुक्त समितीच्या आरोपानुसार यापूर्वीसुद्धा अशा प्रकारची प्रकरणे झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.
गावातील तक्रारी या तंटामुक्त समितीकडे येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाची कामे आम्ही करावे काय तसेच त्यांचेकडे असलेल्या तक्रारी निवारण आम्ही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लेहेगावला मिळालेला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार २०११-१२ चा मिळाला. त्यामध्ये ३ लक्ष रूपयांचा धनादेश मिळाला. या निधीचा उपयोग करण्याच्या कारणावरूनसुद्धा तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांच्यात वेळोवेळी खटके उडत आहेत.
लेहेगावात आलेल्या विविध निधी व योजनांच्या संदर्भातसुद्धा तंटामुक्त समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर्षी आलेल्या सौर ऊर्जेवरील लाईटवरूनसुद्धा गावात वातावरण तापले आहे. गावातील रस्ते, गल्ली यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाला विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु मुद्दा मार्गी लागला नाही, असा आरोप तंटामुक्तीचे उपाध्यक्ष पाचखडे यांनी केला. याची तक्रार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव डोंगरदिवे, पाचखंडे, शालिकराम चुलेट यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

Web Title: Sir-Panchchal Committee, urged against the secretary, Elgar against the secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.