चांदूर रेल्वेच्या पंचायत समिती आवारात सीटूचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:58+5:302021-06-30T04:09:58+5:30
विविध मागण्यांचा समावेश शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविले निवेदन शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविले निवेदन चांदूर रेल्वे : शालेय पोषण आहार कामगार संघटना ...
विविध मागण्यांचा समावेश
शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविले निवेदन
शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविले निवेदन
चांदूर रेल्वे :
शालेय पोषण आहार कामगार संघटना (सीटू) शाखा चांदूर रेल्वे यांच्यावतीने मंगळवारी विविध मागण्यांकरिता स्थानिक पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये पोषण आहाराचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न करता जैसे थे शाळेतून ताजा आहार शिजलेला द्या, १८ हजार रुपये दरमहा मानधन द्या, सर्व कामगारांना कामगारांचा दर्जा मिळाला पाहिजे, कोरोना काळात कामगारांना दहा हजार रुपये पॅकेज द्या आदी मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांचे निवेदन स्थानिक खंडविकास अधिकारी यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये सीटू बांधकाम कामगार अध्यक्ष महादेव गारपवार, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव दिलीप शापामोहन, किसान सभेचे अध्यक्ष देविदास राऊत, सीपीएमचे तालुका सचिव रामदास कारमोरे, शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या चांदूर रेल्वे तालुका अध्यक्षा रेखा कुमरे, तालुका सचिव धरती बोरकर, नंदा नंदरधने, सारिका गावंडे अनिता वाडेकर, शारदा भलावी, पुष्पा नांगले, सुनंदा काळे, रेखा गवई, रंजना मसारे, कविता गुळारांधे, रूपाली भलावी, लता वाघमारे, सरिता यूवनाते, सुनंदा काळे, किरण नेवारे, इंदू दंडाळे, अनिता पोहणे यांसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
===Photopath===
290621\img-20210629-wa0024.jpg
===Caption===
photo