खोटे आरोप, मारहाणीमुळे शिवकुमारने केला आत्मघात; गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: August 30, 2023 05:59 PM2023-08-30T17:59:07+5:302023-08-30T17:59:44+5:30

बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Sivakumar committed suicide due to false accusations, beatings; Filed a case | खोटे आरोप, मारहाणीमुळे शिवकुमारने केला आत्मघात; गुन्हा दाखल

खोटे आरोप, मारहाणीमुळे शिवकुमारने केला आत्मघात; गुन्हा दाखल

googlenewsNext

अमरावती : खोटे आरोप करीत शिवीगाळ व मारहाण केल्याने तो विमनस्क झाला. काय करावे त्याला सुचेनासे झाले. त्या विचारमग्न स्थितीत त्या मुलाने स्वत:ला विहिरीत झोकून दिले. ही धक्कादायक घटना दाभा येथील शिवारात १७ ऑगस्ट दुपारी २.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. शिवकुमार शिशुपाल कुशवाह (१७, रा. दाभा) असे मृतकाचे तर नंदकिशोर बद्रीप्रसाद कुशवाह (३९, रा. दाभा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारीनसार, १७ ऑगस्ट रोजी शिवकुमार हा पेपर देऊन घरी आल्यानंतर वडील शिशुपाल कुशवाह (४४) यांनी त्याला उशिर का झाला, अशी विचारणा केली. त्यावर त्याने निंभोरा लाहे या रस्त्याने येत असताना ‘तू माझ्या मुलीला फोन का करतोस’, असे म्हणून नंदकिशोर कुशवाह याने मला शिवीगाळ व मारहाण केली, असे सांगितले. त्यावेळी वडील शिशुपाल यांनी शिवकुमारला आपण पोलिसांत रिपोर्ट देऊ, असे म्हणून त्याला धीर दिला. मात्र, त्या घटनेचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाल्याने शिवकुमार वडिलांचे म्हणणे ऐकून न घेता धावतच झोपडीजवळ गेला. त्याने तेथील खाटेवर कॉलेज बॅग व मोबाइल फेकून देत शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार

घटनेनंतर नंदकिशोर कुशवाह याने आपला मुलगा शिवकुमार याच्यावर खोटे आरोप करीत शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे त्याच्या बालमनावर परिणाम होऊन त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार वडील शिशुपाल यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल केली.

मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून २९ ऑगस्ट रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

- नितीन मगर, ठाणेदार, बडनेरा

Web Title: Sivakumar committed suicide due to false accusations, beatings; Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.