चिखलसावंगी येथे एकाच दिवशी सहा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:45+5:302021-06-03T04:10:45+5:30

मोर्शी : नजीकच्या चिखलसावंगी या गावामध्ये १ जूनच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा घरे फोडली. येथून ...

Six burglaries on the same day at Chikhalasawangi | चिखलसावंगी येथे एकाच दिवशी सहा घरफोडी

चिखलसावंगी येथे एकाच दिवशी सहा घरफोडी

Next

मोर्शी : नजीकच्या चिखलसावंगी या गावामध्ये १ जूनच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा घरे फोडली. येथून लाखो रुपयांचे सोने व रोकड लंपास करण्यात आली. मोर्शी पोलीस अज्ञात चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलीस सूत्रांनुसार, चिखलसावंगी येथील चरणदास कळसकर यांच्या घरून अडीच लाखांची सोने व ३५ हजार रोकड तसेच रजनी भुसारी यांच्या घरून दीड लाखांचे सोने, प्रफुल जांभळे यांच्या घरातून सव्वा लाखांचे सोने व ६० हजारांचे रोकड लंपास करण्यात आल्याचे तक्रारदारांनी सांगितले. चरणदास कळसकर यांनी शेत लागवडीसाठी रोकड घरी आणून ठेवली होती. १ जून रोजी रात्री ११.३० वाजता ते शेतात गेले. ओलीत करून रात्री ३ वाजता घरी परत आल्यानंतर चोरी निदर्शनास आली. चोरट्यांनी आपला मोर्चा आजूबाजूच्या घरात वळविला. चरणदास कळसकर यांच्या आजूबाजूला असलेले शिवदास कळसकर, देविदास कळसकर, राजेंद्र राखे, संजय चिखले व रंजना भुसारी यांच्या घराकडेसुद्धा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश मिळविला. या घरी चोरीचा असफल प्रयत्न करीत असताना चोरट्यांच्या हाती फारसे काही लागू शकले नाही. या पाच घरातूनसुद्धा अज्ञात चोरट्यांनी जवळपास १० ते १५ हजारांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त होताच ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, सहायक उपनिरीक्षक राजू मडावी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखडे, विष्णू पवार ही चमू घटनास्थळी दाखल झाली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल नोंदवून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Six burglaries on the same day at Chikhalasawangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.