सहा कोटींचा दुष्काळ निधी शासनजमा
By admin | Published: April 6, 2015 12:34 AM2015-04-06T00:34:09+5:302015-04-06T00:34:09+5:30
यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले.
उदासीनता : तीन तालुक्यांना पुन्हा सहा कोटींचे वाटप
अमरावती : यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले. शासनाने दुष्काळस्थिती घोषित करुन प्रचलित निकषानुसार शासन मदत घोषित केली. जिल्ह्याला दोन टप्प्यात २५१ कोटी ६१ लाख प्राप्त झाले. ३१ मार्चपर्यंत सर्व तालुक्यांत २४३ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या अडचणीमुळे ९ कोटी ३५ लाखांचा निधी शासनजमा करण्यात आला आहे. पाच टक्के शेतकऱ्यांचा हा निधी समर्पित झाला आहे.
राज्य शासनाने जिल्ह्यात पहिल्या टप्यात ७ जानेवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी दिला. दुसऱ्या टप्यात २ फेब्रुवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी वितरित केला.
जिल्हा प्रशासनाने २५१ कोटी ६३ लाखांचा निधी सर्व तालुक्याला वितरित केला. यामधून जिल्हा प्रशासनाला परत आलेल्या निधीपैकी आवश्यकता असणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला १ कोटी २३ लाख, चांदूररेल्वे तालुक्याला ५ कोटी व वरुड तालुक्याला ६ कोटींचे वाटप करण्यात आला. ३१ मार्चपर्यंत २५१ कोटी ६३ लाखांपैकी २४३ कोटींचे वाटप करण्यात आले. याची टक्केवारी ९४ एवढी आहे. (प्रतिनिधी)