कोविड रुग्णालयातील सहा जणांना ‘डिस्चार्ज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:01:13+5:30

यामध्ये आझाद कॉलनीतील एक ३१ वर्षांचा तरुण, तसेच येथील बफर झोनमधील ५ वर्षांचा मुलगा, १३ वर्षांची मुलगी, १० वर्षांची मुलगी, ३० वर्षांची महिला व ३५ वर्षांचा पुरुष यांचा समावेश आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला असता, पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात हलविण्यात आले होते.

Six discharged from Kovid Hospital | कोविड रुग्णालयातील सहा जणांना ‘डिस्चार्ज’

कोविड रुग्णालयातील सहा जणांना ‘डिस्चार्ज’

Next
ठळक मुद्देउपचारानंतर बरे : आरोग्य यंत्रणेद्वारा टाळ्या वाजवून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उपचारानंतर बरे झाल्याने शनिवारी रात्री उशिरा कोविड रुग्णालयातील सहा जणांना त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात आले. यामध्ये तीन पुरुष व एका चिमुकलीसह तीन महिलांचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणेद्वारा त्यांचे टाळ्या वाजवून व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. गृह विलगीकरणात त्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतच्या सूचना सीएस यांनी त्यांना दिल्यात.
यामध्ये आझाद कॉलनीतील एक ३१ वर्षांचा तरुण, तसेच येथील बफर झोनमधील ५ वर्षांचा मुलगा, १३ वर्षांची मुलगी, १० वर्षांची मुलगी, ३० वर्षांची महिला व ३५ वर्षांचा पुरुष यांचा समावेश आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला असता, पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात हलविण्यात आले होते. या कालावधीत त्यांना पाच दिवसांचा औषधांचा कोर्स देण्यात आला व नंतरचे पाच दिवस त्यांना निरीक्षणात ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसून आलेली नसल्याने शनिवारी रात्री उशिरा कोविड रुग्णालयातून ह्यडिस्चार्जह्ण देण्यात आल्याची माहिती सीएस डॉ.श्यामसुंदर निकम यांनी दिली. या सहा जणांना डिस्चार्ज दिल्यानंतर कोरोनामुक्तांची संख्या आता ६२ वर पोहोचली आहे. एकीकडे कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना उपचारानंतर बरे होणाºया नागरिकांचीदेखील संख्यावाढ होत असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. या सर्व रुग्णांवर शासनाच्या नव्या गाइडलाइननुुसार उपचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

१४ दिवस गृह विलगीकरणात
उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात यावेत, अशा सूचना आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व व्यक्तींना १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत. तसे हमीपत्र या व्यक्तींकडून लिहून घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली.

Web Title: Six discharged from Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.