सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची १३० किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी

By गणेश वासनिक | Published: September 1, 2023 01:54 PM2023-09-01T13:54:07+5:302023-09-01T13:54:21+5:30

इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शन दरम्यान ५२६.७६ किमी स्पीड ट्रायल, वेळेची बचत करण्याचा प्रयोग

Six mail, express trains successfully tested at 130 kmph | सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची १३० किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी

सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची १३० किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी

googlenewsNext

अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागातंर्गत सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची ३० किमी प्रतितास वेगाची चाचणी बुधवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शन दरम्यान ५२६.७६ किमी स्पीड ट्रायल घेण्यात आली असून, याद्वारे वेळेची बचत करण्याचा प्रयोग रेल्वे विभागाचा आहे.

२६ ते ३० ऑगस्ट यादरम्यान इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनमध्ये ५२६.७६ किमीचे अंतर सहा ट्रेनसह अप आणि डाउन दिशानिर्देशांमध्ये १३० किमी प्रतिताससह स्पीड ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. यात डाउन दिशेने सरासरी वेळेची 28 मिनिटे बचत झाली आहे आणि अप दिशेत सरासरी वेळेची बचत ३० मिनिटे झाल्याची नोंद भुसावळ विभागाने घेतली आहे. भुसावळ विभागातील ५२६.७६ किमी लांबीच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात एकूण ६७ ट्रेन १३० मी प्रति तास धावण्याचे नियोजन आहे. सहा मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या १३० किमी प्रतितास वेगाच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे १३० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या नियमित धावण्याची पुढील प्रक्रिया निरंतरपणे सुरू असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डी.जी. पाटील यांनी दिली.

या सहा मेल, एक्स्प्रेस गाड्याची झाली यशस्वी चाचणी

- १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस
- १२२९० नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- १२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
-१२१०६ गोंदिया - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- १२८५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा गीतांजली एक्सप्रेस
- १२८६० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस

Web Title: Six mail, express trains successfully tested at 130 kmph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.