सहा मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा; जमिनी खरडल्या, बांध फुटले

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 19, 2023 05:30 PM2023-07-19T17:30:17+5:302023-07-19T17:37:17+5:30

नांदगाव, तिवसा, धामणगाव तालुक्यात दमदार पाऊस

Six Mandals hit by heavy rains in Amravati District; Lands were scrapped, dams burst | सहा मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा; जमिनी खरडल्या, बांध फुटले

सहा मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा; जमिनी खरडल्या, बांध फुटले

googlenewsNext

अमरावती : २४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक २४ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये तिवसा, नांदगाव व धामणगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला व सहा मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पावसाने या तालुक्यातील नदी-नाले प्रवाहीत झाले. यशिवाय नाल्याकाठच्या शेतातील पिके खरडल्या गेली व बांध फुटल्याने शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे.

जिल्ह्यात सर्वधिक ५८.९ मिमी पाऊस तिवसा तालुक्यात तर नांदगाव खंडेश्वर ५२.५ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ४०.७ मिमी पावसाची नोंद झाली. नांदगाव खंडेश्वर महसूल मंडळात ७४.३ मिमी, शिवणी ७४.३, मंगरुळ ९१.८, घुईखेड ७०.३, तिवसा ९४.८, वरखेड ७१.८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. याशिवाय ६० ते ६४ मिमीचे दरम्यान पाच मंडळात पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१५.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात २३५ मिमी पाऊस झालेला आहे. ही ७४ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ४१०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.

चार घरांची पडझड, ८३ हेक्टरमध्ये नुकसान

२४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे चिखलदरा तालुक्यात एक व नांदगाव तालुक्यात तीन घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय नाल्यांना पूर आल्याने नांदगाव तालुक्यातील ८३ हेक्टर शेती खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.

Web Title: Six Mandals hit by heavy rains in Amravati District; Lands were scrapped, dams burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.