राष्ट्रीय थांग-ता स्पर्धेत अमरावतीला सहा पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:47 PM2018-04-06T12:47:40+5:302018-04-06T12:47:50+5:30
डॉ.महर्षी दयानंद विश्वविद्यालय, रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. अमरावतीच्या खेळाडूंनी सहा पदके मिळवून जिल्ह्याची मान उंचावली आहे.
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉ.महर्षी दयानंद विश्वविद्यालय, रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. अमरावतीच्या खेळाडूंनी सहा पदके मिळवून जिल्ह्याची मान उंचावली आहे.
थांग-ता फेडरेशन आॅफ इंडिया व हरियाणा थांग-ता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मार्च दरम्यान रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून, महाराष्ट्रातून सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, चंद्रपूर, भंडारा, बीड व अमरावती जिल्ह्यातील १०२ खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सबज्युनिअर २५ किलो वजनगटात अमरावती येथील मणीबाई गुजराथी हायस्कूलची विद्यार्थिनी आरुषी धामणकर हिला सुवर्ण पदक व बेस्ट फायटर गर्ल ट्रॉफी, स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी सोहम उदासी याला रौप्य पदक, सबज्युनिअर ३३ किलो वजनगटात पी.आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सोनल निंघोट हिला कांस्य पदक, सबज्युनिअर ३७ किलो वजनगटात मराठी गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी दर्शना खांडेकर हिला सुवर्ण पदक, सबज्युनिअर ४१ किलो वजनगटात नारायणदास लढ्ढा हायस्कूलची विद्यार्थिनी खुशी पांडे हिला रौप्य पदक, सबज्युनिअर ५३ किलो वजनगटात नारायणदास लढ्ढा हायस्कुलची विद्यार्थिनी पूर्वा खोत हिला कांस्य पदकाने भारतीय मोदी आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव आहुजा, हरियाणा महर्षी दयानंद विश्वविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. देवेंद्र सिंह ढुल, तसेच थांग-ता फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष प्रेमकुमार सिंह यांच्या हस्ता सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्र संघाला सेकंड रनर ट्रॉफीने गौरविण्यात आले. खेळाडूंनी आपल्या यशाचे मुख्य प्रशिक्षक व प्रसारक महावीर धुळधर, आई-वडील, प्राचार्य व शिक्षकांना दिले. त्यांना
महाराष्ट्र संघाला ९२ पदके
या स्पर्धेत महाराष्ट्रातून १०२ खेळाडूंनी सहभाग घेतला. १७ सुवर्ण, ३४ रौप्य व ४१ कांस्य पदक प्राप्त झाले आहेत. तसेच महाराष्ट्र संघ सेकंड विनर म्हणून सन्मानास पात्रही राहिला.