रशिया येथील ज्युनियर विश्व फ्री स्टाईल कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सहा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:58+5:302021-08-24T04:16:58+5:30

(कॉमन) फोटो २३एएमपीएच०१ अमरावती : रशियाच्या उफा येथे १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या ज्युनियर विश्व फ्री स्टाईल ...

Six medals at the Junior World Freestyle Wrestling Championships in Russia | रशिया येथील ज्युनियर विश्व फ्री स्टाईल कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सहा पदक

रशिया येथील ज्युनियर विश्व फ्री स्टाईल कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सहा पदक

Next

(कॉमन) फोटो २३एएमपीएच०१

अमरावती : रशियाच्या उफा येथे १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या ज्युनियर विश्व फ्री स्टाईल कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताला सहा पदक प्राप्त झाली आहे. अमरावती येथील कुस्ती प्रशिक्षक रणविरसिंग राहल यांच्या मार्गदर्शनात चमूने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बीजभूषण शरण सिंग यांनी रणविरसिंग यांची कुस्ती प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. हरियाणाच्या सोनीपत येथील साई प्रशिक्षण केंद्रात भारतीय कुस्ती संघात निवड झालेल्या कुस्तीगिरांना रणविरसिंग राहल यांच्या व्दारा १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत राष्ट्रीय कुस्ती शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले. रणविरसिंग राहल व परवेश मान, अजय सिंह यांच्या मार्गदर्शनात भारतीय कुस्ती संघाने ६१ किलो वजन गटात रवींद्र कुमार (हरियाणा) यांनी रौप्य पदक प्राप्त केले. तसेच ५ कास्य पदक ७४ किलो वजन गटात यश कुमार (हरियाणा), ७९ किलो वजन गटात गौरव बालीयान (उत्तर प्रदेश), ९२ किलो वजन गटात पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र), ९७ किलो वजन गटात दीपक कुमार (हरियाणा), १२५ किलो वजन गटात अनिरुद्ध कुमार (दिल्ली) या खेळाडूंनी असे एकूण ६ पदक मिळवून १०१ अंक प्राप्त केले. भारतीय कुस्ती संघाला सर्व साधारण विजेतापदामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त झाले. रणविरसिंग राहल हे पोलीस खात्यात कार्यरत असून सध्या एन.सी.ओ.ई. साई मुंबई येथे मिशन ऑलम्पिक २०२४ व २०२८ करीता कुस्ती खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे.

Web Title: Six medals at the Junior World Freestyle Wrestling Championships in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.