Asia Cup: दुबई येथील टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी अमरावतीच्या सहा खेळाडूंची निवड

By गणेश वासनिक | Published: August 25, 2022 04:43 PM2022-08-25T16:43:05+5:302022-08-25T16:43:55+5:30

अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, चेन्नई येथे खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन

Six players from Amravati selected for Tennis Ball Cricket Asia Cup 2022 in Dubai | Asia Cup: दुबई येथील टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी अमरावतीच्या सहा खेळाडूंची निवड

Asia Cup: दुबई येथील टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी अमरावतीच्या सहा खेळाडूंची निवड

Next

Asia Cup 2022 Tennis Ball Cricket: अमरावती / गणेश वासनिक: येत्या डिसेंबर २०२२ मध्ये दुबई येथे होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी अमरावतीच्या सहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात अरहान खान, अथर मलिक, तबीश मिर्झा, हैनुल अबैदिन, आतिफ फराज, सलीम खान, रफी दोसानी या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अमरावती जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या चमूने जालना येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळाचे दमदार प्रदर्शन केले. त्यानंतर तामिळनाडूच्या चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट निवड समितीपुढे अमरावती संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली. टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी भारतीय संघात सहा खेळाडूंची निवड झाल्यानंतर अमरावतीत प्रवेश करताच प्रसंगी या खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार

अमरावती येथील जमील कॉलनीच्या एका सभागृहात दुबई येथील टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी निवड झालेल्या सहा खेळाडूंचा दणक्यात सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुस्लीम समाजाच्या वतीनेही या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी हाजी रोशन, हाजी नजीर बी.के., भुरू सेठ, शेख काशीफ, तनवीर जमाल, अशरफ पठाण, नसीम सुफी, अशफाक खान, कलंदरोद्दीन, हाजी जाबार, मजहर सुफी, वहीद खान, कमर जलील, अलीम सर आदी उपस्थित होते.

Web Title: Six players from Amravati selected for Tennis Ball Cricket Asia Cup 2022 in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.