सहा स्पेशल रेल्वे गाड्या ३० एप्रिलपर्यंत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:42+5:302021-04-16T04:12:42+5:30

अमरावती : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या नागपूर-भुसावळ या दरम्यान धावणाऱ्या सहा स्पेशल रेल्वे गाड्या ३० एप्रिलपर्यंत ...

Six special trains canceled till April 30 | सहा स्पेशल रेल्वे गाड्या ३० एप्रिलपर्यंत रद्द

सहा स्पेशल रेल्वे गाड्या ३० एप्रिलपर्यंत रद्द

Next

अमरावती : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या नागपूर-भुसावळ या दरम्यान धावणाऱ्या सहा स्पेशल रेल्वे गाड्या ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये हल्ली गर्दी नसून, लॉकडाऊनमुळे हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे प्रबंधक पी.के. सिन्हा यांनी दिली.

१४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनावश्यक गर्दी होणार नाही, याची काळजी प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने रेल्वे विभागाने प्रवासी नसलेल्या गाड्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अमरावती- पुणे (०२११७), नागपूर- पुणे (०२०४२), पुणे-अजनी (०२२३९), नागपूर -पुणे (०३६३५) नागपूर- अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस (०११३७) पुणे- अजनी (०२२२३) या स्पेशल गाड्यांना ३० ए्‌प्रिलपर्यंत ब्रेक लावण्यात आला आहे. १५ एप्रिलपासून अप-डाऊनच्या गाड्या ३० एप्रिलपर्यंत धावणार नाही, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यापैकी बहुतांश गाड्या साप्ताहिक, आठवड्यातून दोन ते तीन दिवस धावणाऱ्या आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्यांनाही फटका बसत आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाने स्टेशन प्रबंधकांना गाड्या रद्द झाल्याबाबतचे कळविले आहे.

Web Title: Six special trains canceled till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.