अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:12+5:302021-09-17T04:18:12+5:30

अमरावती : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने भिवापूर तलावाच्या पाण्यात अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली. वेळीच उपयाययोजना करण्यात ...

Six villages, including Anjangaon Bari, survived the floods | अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली

अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली

Next

अमरावती : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने भिवापूर तलावाच्या पाण्यात अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली. वेळीच उपयाययोजना करण्यात आल्याने मोठी हानी टळली. परिणामी अंजनगाव बारी ग्रामपंचायतने विशेष ठराव करून आमदार रवि राणा व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे कौतुक करीत आभार मानले.

जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, पंचायत समिती सदस्य मीनल डकरे यांच्या नेतृत्वात सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पवनीत कौर यांचा सत्कार केला, हे विशेष. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार रवि राणा यांनी रात्री स्वतः भिवापूर तलाव परिसरात जाऊन प्रशासनाला तलाव फुटण्याच्या धोक्याबद्दल अवगत केले. तात्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीसुद्धा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून समयसूचकता दाखवित संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले व तलावाचा बांध मोकळा करून पाण्याला वाट देऊन तलाव फुटण्यापासून व अंजनगाव बारी आणि लगतच्या पार्डी, अऱ्हाड, कुऱ्हाड, उदखेड, भानखेड, गोविंदपूर आदी गावे जलमय होऊन जीवितहानी व नुकसान होण्यापासून वाचविले. यामुळे ग्रामपंचायतने विशेष ठराव करून आमदार रवि राणा व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आभार मानले व भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी भिवापूर तलावाला संरक्षक भिंत व बांध बांधण्यासाठी दोन कोटींची मागणी केली.

उपवनसंरक्षक चंद्रसेखरन बाला यांच्यासह युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, पंचायत समिती सदस्य मीनल डकरे, अजय घुले, आशिष कावरे, विनोद जायलवाल, सरपंच प्रकाश खंडारे, उपसरपंच जगदीश अंबाडकर, सदस्य उमेश डकरे, अरविंद निंबर्ते, अर्चना टवलारे, प्रणाली तेटू, दीपाली तलवारे, मेघा भुजाडे, सुनील निचत, विजय इंगोले, विजय पोकळे, अशोक कारमोरे, चंद्रकांत खडसे, हर्षल रेवणे, अवि काळे, अजय बोबडे, शुभम उंबरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Six villages, including Anjangaon Bari, survived the floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.