बोंडअळी बाधित कापसामुळेच त्वचाविकाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:16 AM2018-03-02T01:16:40+5:302018-03-02T01:16:40+5:30

सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची घरात साठवणूक केली, मात्र बोंडअळीने बाधित असल्यामुळे कापसाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे.

Skin disorders due to affected cotton crop | बोंडअळी बाधित कापसामुळेच त्वचाविकाराची लागण

बोंडअळी बाधित कापसामुळेच त्वचाविकाराची लागण

Next
ठळक मुद्देवेचणीला मजूर मिळेनात : संपर्र्कात येणाऱ्यांना व्याधी, कंपन्यांनी द्यावी भरपाई, शेतकरी मिशनची मागणी

ऑनलाईन लोकमत
अमरावती : सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची घरात साठवणूक केली, मात्र बोंडअळीने बाधित असल्यामुळे कापसाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकंट शेतकऱ्यांवर ओढावलेल आहे. यासाठी अशा रुग्णांना मोफत उपचार करून बियाणे कंपण्यांकडून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी मिशनद्वारा करण्यात आली.
विदर्भ व मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतरचे वास्तव भयावह असल्याचे त्यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले. याविषयी राज्य सरकारला दिलेल्या अहवालात सत्य अधोरेखित केले आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या कापसातील जंतू मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यानेच गावखेड्यात सर्वत्र अ‍ॅॅलर्जी व प्रचंड खाजेच्या आजाराने शेकडोच्या संख्येनी शेतकरी प्रभावित झाले आहेत. उपचाराच्या नावावर अनेकांची प्रचंड लूट होत असल्याच्या तक्रारी मिशनकडे आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकºयांचे गुलाबी अळींच्या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाचा सहभागााह शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. बोंडअळीग्रस्त पीक समूळ नष्ट करणे, जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे, कपाशीची फरदळ न घेता काढून टाकणे, मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे, पुढच्या वर्षी डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे, विदेशी कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी देशी सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापूस उत्पादक शेतकºयांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते, केंद्रीय कापूस शोध संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असल्याचा सल्ला मिशनद्वारा राज्य शासनाला दिला.
साठवणूक केलेल्या कापसामुळेच खाज, अ‍ॅलर्जी
सोनबर्डी येथे घरात साठविलेल्या कापसामुळे खाज व त्वचारोगाची लागण होत असल्यामुळे शेतकºयांनी कापूस अंगणात ठेवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव व झरी तालुक्यात बी.टी. कापसामुळे प्रचंड प्रमाणात त्वचाविकाराची लागण झाल्याच्या शेकडो तक्रारी आल्यानंतर कै. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डीन मनीष शिरिगिरवार यांनी तेथे विषेश चमू पाठविली. यवतमाळचे जिल्हाधिकाºयांनी अ‍ॅलर्जी व त्वचाविकाराची सर्वच औषधी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिली आहे. अमरावती जिल्ह्यात मंगरूळ दस्तगीरला त्वचाविकार होत असल्याच्या तक्रारी आहेत.

बीटी कपाशीपासून कुठल्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही, हे मागील १५ वर्षांच्या परीक्षणामधून स्पष्ट झाले आहे. मात्र, कापसातील काही किडीमुळे अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता आहे.
- सी. डी. मायी, माजी अध्यक्ष,एएसआरबी, दिल्ली

Web Title: Skin disorders due to affected cotton crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.