कडुनिंबाच्या झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:48 PM2018-12-01T22:48:12+5:302018-12-01T22:48:45+5:30

कोठारा-खरपी दरम्यान बैतुल मार्गावर नागरिकांच्या डोळ्यांदेखत कडुनिंबाच्या हिरव्या झाडांची कत्तल होत आहे.

Slaughter of neem tree | कडुनिंबाच्या झाडांची कत्तल

कडुनिंबाच्या झाडांची कत्तल

Next
ठळक मुद्देवाहतुकीला अडसर : परतवाडा वनक्षेत्रपालांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कोठारा-खरपी दरम्यान बैतुल मार्गावर नागरिकांच्या डोळ्यांदेखत कडुनिंबाच्या हिरव्या झाडांची कत्तल होत आहे.
शनिवार दुपारी दीड वाजतापासून कडुनिंबाची कत्तल सुरू आहे. एकाच झाडावर सहा ते सात लोक कुºहाडी व आऱ्या चालवित होते. प्रवाशांना त्रास होणार नाही, याचीही दक्षताही येथे घेतली जात नव्हती. त्यामुळे एक ते दोन तास रस्त्यावरील वाहतूक बाधित झाली. निर्दयीपणे तोडलेल्या या उच्चप्रतीच्या कडुनिंबाच्या लाकडांची वाहतूकही सर्वांदेखत करण्यात आली. कोठारा-खरपी दरम्यान ही वृक्षतोड होत असताना, परतवाडा वनविभागातील वनक्षेत्रपाल आणि त्यांच्या अधिनस्थ वनरक्षकांना साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही.
वृक्षतोडीची वनविभागानेच परवानगी दिली आहे. परवानगी देताना वृक्षाची स्थितीदर्शक पंचनामा चुकीचा केल्याचे दिसून येते. झाड निकोप, सरळ, भरीव व उच्च प्रतीचे असतानाही अनेक झाडांना त्यांनी पोकळ दाखवले आहे. हिरव्या झाडाला वाळलेले आणि निकृष्ट दाखविण्याचा प्रतापही वनविभागाने केला आहे.
पंचनामा व टीपी
वृक्षतोडीच्या अनुषंगाने वनपालांना विचारले असता, वृक्षतोडीनंतर पंचनामा होईल, मग टीपी दिला जाईल, मगच वाहतूक करता येईल, असे सांगितले. वस्तुस्थिती अशी की, कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडाची वाहतूक करताना वननियमानुसार टीपी आवश्यक आहे.
वरिष्ठांचा आदेश?
परतवाडा येथील वनपालांशी याबाबत घटनास्थळाहून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी ‘वरच्या आदेशा’चा हवाला दिला. वनरक्षक गस्तीवर असल्याचेही ते म्हणाले. प्रत्यक्षात त्यांच्या अधिनस्थ हत्तीघाट, पूर्व हत्तीघाट, पश्चिम हत्तीघाट, बहिरम, शिरजगाव, पांढरी, गोंडविहीर, काळवीट परिसरात १ डिसेंबरला एकही वनरक्षक कार्यरत असल्याचे दिसून आले नाही. वनचौकीदारही जंगलात बघायला मिळाले नाहीत.

Web Title: Slaughter of neem tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.