आपल्याच घरात हाल सोसतेय मायबोली

By admin | Published: February 27, 2017 12:14 AM2017-02-27T00:14:21+5:302017-02-27T00:14:21+5:30

रूप लावण्याने मोहरूण ऐेटीत झडपली मराठी, सीमोलंघन करीत अटकेपार झडपली मराठी।

Sleeps in your own house | आपल्याच घरात हाल सोसतेय मायबोली

आपल्याच घरात हाल सोसतेय मायबोली

Next

आज मराठी राजभाषा दिन : मराठीच्या अस्तित्वासाठी लढाई; न्याय व्यवस्थेत ५० टक्के मराठीचा वापर
मोहन राऊत अमरावती
रूप लावण्याने मोहरूण
ऐेटीत झडपली मराठी,
सीमोलंघन करीत
अटकेपार झडपली मराठी।
देहू पंढरीच्या स्पर्शाने
गोदातीरी धडकली मराठी,
चकाकणाऱ्या इंग्रजीच्या
कुंपणात अडकली मराठी।।
मागील एक हजार वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी मायबोली आपल्या घरातच हाल सोसतेय आहे़ आज शुध्द मराठी वाक्य कानावर पडत नाही, तर बालवाडीपासून ते केजी नर्सरीपर्यंत या मायबोलीच्या भाषेत इंग्रजी हिंदी शब्दांचा वापर होत असल्यामुळे अस्तित्वाची लढाई या मराठी भाषेला लढावी लागत आहे़
सोमवारी मराठी राज भाषा दिन आहे़ प्रत्येकाने अस्सल मराठी भाषेत बोलावे, पाल्यांना मराठी शाळेत प्रवेश द्यावा, ग्रामस्तरापासून तर मंत्रालयातील न्याय व्यवस्थेतही मराठी भाषेचा वापर करून आदेश याच भाषेत काढावे असे आदेश अनेक वर्षांपासून राज्य शासन देत असताना केवळ हे आदेश कागदोपत्री ठरले असल्याची वस्तुस्थिती आहे़ केवळ मराठी भाषा साहित्य संमेलन व काव्य मैलफीच्या मंचावर मराठी भाषेचा वापर होतो. शासन तळमळीने मराठी भाषेसाठी धोरण राबविताना दिसत नाही.
आज या मराठीत हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्दाचा शिरकाव झाला आहे़ दहा शब्दांच्या एका मराठी वाक्यात किमान सहा शब्द इंग्रजी असतात ही सध्या मराठीची अवस्था आहे़ आजच्या शाळेत जाणाऱ्या पिढी पासून ते पदवी हातात घेऊन शासकीय खात्यात नोकरी करणाऱ्या २५ ते ३५ या वयोगटातील तरूण मराठी बोलताना इंग्रजी भाषा मिसळत असताना ऐकायला मिळते. शाळेकरी मुलांची बोटेही माऊस व की बोर्डवर सराईत पणे फिरत आहे़ या इंटरनेटच्या जाळ्यात आगामी अर्ध्या शतकात मराठी कितपत टिकेल या विषयी चिंता अस्सल मराठी भाषा बोलणाऱ्यांनी व्यक्त केली आहे़ ९ कोटी लोकांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला १ हजार वर्षांचा इतिहास आहे़ आज सर्वाधिक दर्जाचे व प्रगतीचे शिक्षण मराठी शाळेत मिळत असलेतरी या ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे़ या मराठी शाळेत जाणाऱ्या मुलाकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली आहे़
नोकरीसाठी केवळ मराठीचा वापर
आज संशोधनाच्या पातळीवर मराठी संतरचना, नाटक, कथा, कादंबऱ्या, अशा साहित्यिक अंगाने प्रबंध सादर करणाऱ्यांचा कल दिसत आहे़ पदव्युत्तर पदवी व पीएचडी चे नामाविधान मिळाल्यानंतर नोकरी मिळण्यासाठी मराठी विषयात पीएचडी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ परंतु अनेक प्राध्यापकांकडून अभ्यासक्रमाशी निगडित वाचन करण्यापलीकडे मराठी भाषेचा भाषिक संर्वधनाच्या पातळीवर अभ्यास होत नाही, ही स्थिती आहे़

न्याय व्यवस्थेत ५० टक्के भाषा
सर्वसामान्य माणसांना कायद्याविषयी अधिक ज्ञान व्हावे, कायद्यापासून अज्ञानी राहू नये, म्हणून न्याय व्यवहारात प्रांतिक भाषेचा वापर करण्याचे आदेश राज्य शासनाने यापूर्वीच दिलेत. परंतु राज्याच्या जिल्हा न्यायालयात या भाषेचा वापर केवळ ५० टक्के होत असल्याचे पहायला मिळत आहे़ ही भाषा टिकवीण्यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी साहित्य अकादमीने त्वरित निर्णय घ्यावा. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि़वा़शिरवाळकर यांचा जन्मदिवस आहे़ या दिवशी साहित्य अकादमीने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा़
- विनायक त्रिपत्तीवार,
उपाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

Web Title: Sleeps in your own house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.