अमरावतीमध्ये कोरोनाचे सावटात सावकाश मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:07 AM2020-12-01T11:07:57+5:302020-12-01T11:08:17+5:30

Amravati News Election अमरावती विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता विभागातील ७७ मतदान केंद्रांवर उत्साहात सुरुवात झाली.

Slow polling in Amravati | अमरावतीमध्ये कोरोनाचे सावटात सावकाश मतदान

अमरावतीमध्ये कोरोनाचे सावटात सावकाश मतदान

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता विभागातील ७७ मतदान केंद्रांवर उत्साहात सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दोन तासांत १०.११ टकेच मतदान झाले. अमरावती जिल्ह्यात ९.६४ अकोला ९.३४ वाशिम ११.९६, बुलढाणा १०.९ व यवतमाळ जिल्ह्यात १०.५१ टक्के मतदान झाले.
शहरी भागात गर्दी दिसत असली तरी ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. निवडणूक विभागाने सध्या तरी पूर्ण खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक मतदाराची आरोग्य तपासणी, मतदानासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवून रांगा. दिव्यांगासाठी व्हील चेअर व लक्षणे आढळल्यास प्रत्येक मतदान केंद्रावर विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Slow polling in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.