लसीकरणाची मंदगती, प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:07+5:302021-07-29T04:13:07+5:30
अमरावती : जिल्ह्यात लसींचा पुरवठा विस्कळीत असल्यामुळे आठवड्यातील दोन ते तीन दिवस केंद्र बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली ...
अमरावती : जिल्ह्यात लसींचा पुरवठा विस्कळीत असल्यामुळे आठवड्यातील दोन ते तीन दिवस केंद्र बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तरुणाईला केंद्रांवरून माघारी परतावे लागत आहे. अद्याप १.३० लाख तरुणाईचा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यामुळे दोन्ही डोस मिळण्यासाठी दोन वर्षे लागणार का, अशीच स्थिती राहिल्यास कोरोनाशी कसे लढणार असा, या तरुणाईचा सवाल आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली व १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील तरुणाईचेही लसीकरण सुरु झालेले आहे. मात्र, या सहा महिन्यांच्या कालावधीत फक्त ७,८७,८१५ नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे. यामध्ये फक्त २,०९,०५४ नागरिकांनी दोन्ही डोस घेतला. ही सात टक्केवारी आहे. कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी सामूहिक रोग प्रतिकारशक्ती तयार होणे महत्त्वाचे आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरणाअभावी डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सामना कसा करणार, असा नागरिकांचा सवाल आहे.
बॉक्स
९० केंद्रात सुरू आहे लसीकरण
जिल्ह्यात कोरोना लसींच्या पुरवठ्यानुसार लसीकरण केंद्रांचे नियोजन ठरविले जात आहे. सध्या पुरवठाच विस्कळीत असल्यामुळे ९० ते १०० केंद्रांमध्ये सद्यस्थितीत लसीकरण होत आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील १९ केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत अर्धाही लसींचा पुरवठा होत नाही. त्यामुळे ५० वर केंद्र नेहमीच बंद राहतात. लस मिळण्यासाठी नागरिक पहाटेपासून रांगा लावतात तर काही जण ग्रामीणमध्येही जात आहेत.
बॉक्स
लसीकरण का वाढेना
मागनीच्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नाही. त्यामुळे शिल्लक डोसचे रोज सायंकाळी नियोजन केले जाते. नागरिकांना याची माहिती मिळत नसल्याने अनेकांना केंद्रांवरून माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली आहे.
कोट
अद्याप पहिलाच डोस नाही
लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली. डेंटल कॉलेज केंद्र होते, लसीकरणाला गेलो असता डोस संपल्याचे सांगण्यात आले. ऑनलाईन नोंदणी असतांना दुसऱ्या दिवसी बोलाविले. कामामुळे जाणे झाले नाही. त्यामुळे अद्याप पहिलाही डोस घेतला नाही.
- एक लाभार्थी
लसीकरणासाठी दोनवेळा सकाळपासून तीन तास रांगेत होतो. काही नंबर राहिले असताना डोस संपल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिसऱ्यांदा रांगेत लागण्याचा प्रयत्न केलाच नाही. ओळखीच्या लोकांचा आल्याबरोबर नंबर कसा लागतो.
- एक लाभार्थी
बॉक्स
केवळ वेटींग
दिनांक दिवसाचे लसीकरण एकूण लसीकरण
पहिल्या दिवशी किती जणांना मिळाली लस : ३०
१ फेब्रुवारी २६९ ४,३१७
१ मार्च ६७९ २८,७००
१ एप्रिल ३,१२७ ३,२१,४४४
१ मे १,८५४ ४,७७,८०३
१ जून ५,९९६ ६,२८,५१९
१ जुलै ५,०६५ ७,०९,०६९
२७ जुलै १०,७९४ ७,८७,८१५
बॉक्स
आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण संख्या पहिला डोस एकूण
आरोग्य कर्मचारी २०,९५५ १४,८७३ ३५,८२८
फ्रंट लाईन वर्कर ४२,११८ १५,१४७ ५७,२६५
१८ ते ४४ वयोगट १,४४,४४७ १४,२६३ १,५८,७१०
४५ ते ५९ वयोगट १,९१,७६८ ७५,६७१ २,६७,४३९
६० वर्षांवरील १,७९,४७३ ८९,१०० २,६८,५७३