मोर्शीत नाफेडकडून तूर खरेदी संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:27 PM2018-03-09T23:27:57+5:302018-03-09T23:27:57+5:30

नाफेडने मोर्शी तालुक्यातील ५२३ शेतकऱ्यांची केवळ ७६३१ क्विंटल तूर खरेदी केली आहे. दरदिवशी ३६३ क्विंटल तूर खरेदी केली जात आहे.

Slowly procure tur from Morshi Nafed | मोर्शीत नाफेडकडून तूर खरेदी संथ गतीने

मोर्शीत नाफेडकडून तूर खरेदी संथ गतीने

Next

आॅनलाईन लोकमत
मोर्शी : नाफेडने मोर्शी तालुक्यातील ५२३ शेतकऱ्यांची केवळ ७६३१ क्विंटल तूर खरेदी केली आहे. दरदिवशी ३६३ क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरेदीचा हा आकडा निम्मा असून, १८ एप्रिलपर्यंत नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांची तूर शासन मोजणार की नाही, याबाबत शंका आहे.
खरेदी-विक्री संघाकडे ३ मार्चपर्यंत ३०९१ शेतकऱ्यांची आॅफलाइन नोंदणी झाली. आॅनलाइन नोंदणीचा आकडा १००० ते ११०० च्या घरात आहे. खरेदी-विक्रीकडून रोज फोनवर ५० शेतकऱ्यांना फोनवर बोलविले जाते. प्रत्यक्ष केंद्रावर १५ ते २० शेतकरी मोजणीसाठी तूर आणत असल्याचे चित्र आहे.
सहायक निबंधक एस.टी. केदार यांनी ३ मार्च रोजी नाफेड तूर खरेदीची पाहणी करून आॅनलाइन नोंदणीसाठी संगणक तसेच खरेदीची गती वाढविण्यास खरेदी-विक्री संघाला सांगितले. यावेळी कृषिउत्पन्न बाजार समिती सचिव लाभेश लिखितकर तसेच नाफेड ग्रेडर प्रशांत हिवसे, विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन प्रतिनिधी नंदकिशोर मेघळ, खरेदी-विक्री प्रतिनिधी वासुदेव ठोंबरे, वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी उपस्थित होते.
यानंतरही स्थिती सुधारली नसल्याचे गुरुवार, ८ मार्च रोजी निदर्शनास आले. खरेदी-विक्री संघातर्फे अफरातफर व गैरव्यवहाराची त्वरित चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराच शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांना दिला. यावेळी भाजप नगरसेवक सुनील ढोले, दीपक नेवारे, सतीश लेकुरवाळे, सुधीर बेले, सुभाष डोंगरे, संजय लेकुरवाळे, मधुकर लेकुरवाळे, धीरज शिरभाते, नीलेश महल्ले, अशोक खवले, सुनीता मसराम, ईश्वर श्रीसाठ, उमेश जौंजाळकर आदी उपस्थित होते.
दोन महिन्यांपासून २३९ व्या क्रमांकाची प्रतीक्षा
मोर्शी येथील शेतकरी देवराव ढोले यांनी १७ जानेवारीला खरेदी-विक्री संघात २३९ क्रमांकावर रीतसर नोंद केली. दोन महिने होत असतानाही त्यांचा नंबर लागलेला नाही. याबाबत विचारणा केली असता, त्यांचा सातबारा गहाळ झाल्याचे आता कळविण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी तालुक्यातील हिवरखेड, अंबाडा, पाळा येथील शेतकºयांचीसुद्धा आहेत.

Web Title: Slowly procure tur from Morshi Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.