‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न १३११ कोटींचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:02 AM2017-11-26T00:02:07+5:302017-11-26T00:03:01+5:30

केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे.

'Smart City' dream of 1311 crore! | ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न १३११ कोटींचे !

‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न १३११ कोटींचे !

Next
ठळक मुद्देअखेरची संधी : राज्यातून एकमेव शहर स्पर्धेत, ३० नोव्हेंबरपर्यंत केंद्राकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे. हा आराखडा शुक्रवारी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. ३० नोव्हेंबरपूर्वी तो केंद्र शासनाच्या शहर विकास मंत्रालयाकडे पाठविला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतून आकारास आलेल्या ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत महापालिकेने यापूर्वी तीनदा सहभाग घेतला. मात्र, प्रस्ताव स्पर्धेत तग धरू शकला नाही. त्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एक सर्वंकष प्रस्ताव अंतिम फेरीसाठी पाठविण्याचे निर्देश पालिकेला प्राप्त झाले. त्याअनुषंगाने पीडब्ल्यूसी कंपनीने पॅनसिटी व रेट्रोफिरिंग या दोन मुख्य घटकांचा समावेश करून ‘स्मार्ट अमरावती’चा प्रस्ताव बनविला. पहिले तिन्ही प्रस्ताव सदोष असल्याने आलिया कन्सल्टंसीऐवजी डीपीआर बनविण्यासाठी पीडब्ल्यूसी या नव्या कन्सल्टंसीला पाचारण करण्यात आले. महापालिका आयुक्त हेमंत पवार व महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी या एजन्सीने सादरीकरण केले. कंपनीने तयार केलेला विस्तृत प्रकल्प आराखडा शुक्रवारी राज्य शासनास पाठविण्यात आला. यात घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक सुरक्षा, रोजगार निर्मिती, पार्किंग, कनेक्टव्हिटी, हेरिटेज संवर्धन, सौंदर्यीकरण, तर पॅनसिटी व रेट्रोफिटिंगमध्ये झोपडपट्टी व जुन्या शहरांचा विकास या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
चौथा प्रस्ताव
याआधी महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’साठी तीनदा प्रस्ताव पाठविले; मात्र ते स्पर्धेत टिकू शकले नाहीत. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात ५५०० कोटी, त्यानंतर हेमंत पवार यांच्या कार्यकाळात अनुक्रमे २२६८ कोटी व १८०५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
जानेवारी २०१६ पासून केंद्र सरकारने ९० स्मार्ट सिटी घोषित केल्या. पहिल्या यादीत २०, दुसºया यादीत १३, तिसºया यादीत २७ व चौथ्या यादीत ३० शहरांचा समावेश होता. यंदाची स्पर्धा ११ शहरांसाठी आहे.

Web Title: 'Smart City' dream of 1311 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.