आॅक्टोंबरअखेर ५० कोटींचा स्मार्ट निधी
By admin | Published: September 20, 2016 12:15 AM2016-09-20T00:15:55+5:302016-09-20T00:15:55+5:30
राज्यशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे
एसपीव्ही रजिस्टर्ड : मार्ग प्रशस्त
अमरावती : राज्यशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.त्यासाठी अनिवार्य असलेल्या विशेष उद्देश वाहन एसपीव्हीचे गठण करण्यात आले आहे.एसपीव्ही ही एक शासकीय कंपनी म्हणून कार्यरत राहील.
एसपीव्हीसाठी आवश्यक असलेल्या संचालकांची आमसभेत निवड झाल्यानंतर एसपीव्हीचे नाव काय असेल ,याबाबतचे सर्वाधिकार आयुक्तांना देम्यात आलेत.त्यानूसार आयुक्त हेमंत पवार यांनी या एसपीव्हीला अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड असे नामानिधान दिले. ही कंपनी केंद्र शासनाच्या कापोररेट अफेयर्स या मंत्रालयाकडे नोंदणीकृत करायची होती.त्यानुसार तो प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आला. त्याच नावावर सोमवारी कार्पोरेट अफेयर्स या मंत्रालयाने अधिकृत शिक्कामोर्तब केले.
सर्टीफिकेट आॅफ इनकार्पोरेशन या शिर्षकाने तसे प्रमाणपत्र या मंत्रालयाने अमरावती महापालिकेला पाठविले आहे. अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या नावाने एसपीव्ही रजिस्टर झाल्यानंतर सोमवारीच नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अमरावती येथे येऊन एसपीव्हीची बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ मागितली गेली आहे. एसपीव्हीचे गठण करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाला देण्यात आली आहे. एसपीव्ही अस्तित्वात आल्याने आॅक्टोबर महिन्यात ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेकडे वर्ग केल्या जाणार आहे. अमरावती स्माटर सिटीसाठी सिडको १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे.त्यातील पहिल्या हप्त्यातील ५० कोटीसाठी एसपीव्हीची नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती.
स्मार्ट सिटी अभियानाकरिता नियुक्त केलेले मागरदशरक अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल हे एसपीव्हीच्या ‘ंसचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत.