स्मार्ट सावर्डीला पालकमंत्र्यांनी गौरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:07 PM2019-01-28T23:07:14+5:302019-01-28T23:07:34+5:30
अमरावती पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत सावर्डी ग्रामपंचायत ने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकांसह दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळविल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते सरपंच आणि सचिवांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले. या ग्रामपंचायतीने मॅजिक पिट व अन्य योजनांची सुरुवात स्वत: करून नवा आदर्श निर्माण केला, हे येथे उल्लेखनीय.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : अमरावती पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत सावर्डी ग्रामपंचायत ने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकांसह दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळविल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते सरपंच आणि सचिवांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले. या ग्रामपंचायतीने मॅजिक पिट व अन्य योजनांची सुरुवात स्वत: करून नवा आदर्श निर्माण केला, हे येथे उल्लेखनीय.
प्रजासत्ताकदिनी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, यांच्या उपस्थितीत सावर्डीचे सरपंच राहुल उके, सचिव कांचन राजपूत यांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले.
सावर्डी येथील सरपंच राहुल उके यांनी सर्व योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून दिला. तंटामुक्त गाव असल्याने या गावातील तंटे आजही गावातच मिटविले जातात. गावात घरोघरी शौचालय असल्याने गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त आहे. कष्टाचा सन्मान झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थित गावकºयांनी व्यक्त केल्या.
स्मार्ट ग्राम योजनेसाठी सावर्डीवासीयांचे अमूल्य सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याशिवाय यश मिळणे अशक्य होते. हा सन्मान सावर्डीवासीयांना समर्पित असून, मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेचा उपयोग केवळ गाव विकासासाठी करण्यात येणार आहे.
- राहुल उके, सरपंच ग्रामपंचायत सावर्डी