स्वच्छ सर्व्हेक्षण - २०१९ अंतर्गत स्मार्ट श्रीमती स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:28 PM2018-09-07T22:28:12+5:302018-09-07T22:28:30+5:30
नगर परिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ अंतर्गत आयोजित स्मार्ट श्रीमती स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी करण्यात आले. सन्मानचिन्ह, चांदीचे नाणे, मुकुट व सॅशे देऊन त्यांना गौरविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : नगर परिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ अंतर्गत आयोजित स्मार्ट श्रीमती स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी करण्यात आले. सन्मानचिन्ह, चांदीचे नाणे, मुकुट व सॅशे देऊन त्यांना गौरविण्यात आले.
नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरात प्रत्येक प्रभागात दर पंधरवड्याला ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीमध्ये टाकण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्याकरिता दररोज ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणाऱ्या नागरिकांना १ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट व १६ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट या पंधरवड्यात स्मार्ट श्रीमती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दररोज ओला व सुका कचरा वेगळा करून देणाºया नागरिकांना कूपन वाटप करून या स्पर्धेचा लकी ड्रॉ ५ सप्टेंबर रोजी शहरातील संत गाडगेबाबा संस्थानच्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्मार्ट श्रीमती स्पर्धेचा लकी ड्रॉ नगर परिषदेच्या अध्यक्ष नलिनी भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य व स्वच्छता समिती सभापती ताजखातून अजीजउल्लाखाँ, महिला व बाल कल्याण सभापती प्रतिभा शेवणे याच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी लकी ड्रॉकरिता शहरातील बहुसंख्य महिला तसेच पत्रकार विजयराव बरगट, मोहोड, देशमुख, कंटाळे कार्यक्रमाला उपस्थित होते.
लकी ड्रॉमध्ये १ आॅगस्ट ते १५ आॅगस्टपर्यंत तसेच ६ आॅगस्ट ते ३० आॅगस्टपर्यंत जमा झालेल्या कूपनचा लकी ड्रॉ घेण्यात आला. त्यामध्ये वैशाली प्रांजळे, महादेव वाकोडे यांच्या सूनबाई दुर्गा ठाकरे, लाईका बेगम, प्रतिभा वानखडे, संजीना कट्यारमल, प्रीती नावडकर, संध्या बगाडे, रंजना मानकर, अरूणा ठाकरे, अनिता डाहे, शुभांगी सोळंके, आरती झंवर, लि.गो. भारसाकळे, शुभांगी पाटणे, राधा साखरे आदी महिला भाग्यवान ठरल्या. त्यांना अध्यक्ष नलिनी भारसाकळे, महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा शेवणे, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती ताजखातून अजीजउल्लाखाँ यांच्या हस्ते स्मार्ट श्रीमती स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये या महिलांना सन्मानचिन्ह, चांदीचे नाणे, मुकुट व सॅशे देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष नलिनी भारसाकळे यांनी सांगितले की, यापुढे ही स्पर्धा अशीच चालू राहणार असून, यामध्ये महिलांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर बनवावे व अस्वच्छतेमुळे पसरणाºया संभाव्य रोगांपासून मुक्त करण्याचा संकल्प करावा. महिलांनी स्वच्छतेचा वसा घ्यावा व आपले कुटुंब सुखी ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. संचालन खंडारे व प्रास्ताविक स्वच्छता निरीक्षक निकीता देशमुख यांनी केले. न. प. सदस्य, कार्यालय अधीक्षक इंगळे, आरोग्य विभागाचे कर्मचारी आरिफ दिलावर, शे. जाकीर, शहाबोद्दीन जमादार तसेच सर्व विभाग व न. प. कर्मचारी उपस्थित होते.