कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ‘स्माईल’ कर्ज योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:40+5:302021-06-25T04:11:40+5:30

अमरावती : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे व्यवसाय उभारून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे ...

‘Smile’ loan scheme for rehabilitation of families who died due to corona | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ‘स्माईल’ कर्ज योजना

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ‘स्माईल’ कर्ज योजना

Next

अमरावती : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे व्यवसाय उभारून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे स्माईल कर्ज योजना राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाव्दारे करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत एक ते पाच लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार असून, एनएसएफडीसी सहभाग ८० टक्के, भांडवल अनुदान २० टक्के तर सहा टक्के व्याजदर व परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असा राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता व कागदपत्रे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा (कुटुंबप्रमुखांच्या रेशनकार्डवर सदर सदस्यांचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता महानगरपालिका/ नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्रधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्तावेज आवश्यक आहे.

योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लक्ष पर्यंत), कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रानिशी कर्ज मागणीचा प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा लिंकवर माहिती भरून सादर करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.

Web Title: ‘Smile’ loan scheme for rehabilitation of families who died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.