शिवशाही बसमधून निघाला धूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:39 AM2019-06-07T01:39:43+5:302019-06-07T01:43:00+5:30
शिवशाही बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने शिवशाही बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, आग लागू नये म्हणून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा केल्यानंतर धूर निघणे बंद झाले व पुढील अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिवशाही बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने शिवशाही बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, आग लागू नये म्हणून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा केल्यानंतर धूर निघणे बंद झाले व पुढील अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजता राजकमल चौकात घडली. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. बसमध्ये कुणीही प्रवासी नसल्याचे अमरावती मध्यवर्ती आगाराच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
अकोलावरून नागपूरकरिता निघालेली अकोला आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच०९ ईएम २२६४ चे ब्रेक लायनर घासत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याकारणाने बस गरम होत होती. त्यामुळे बडनेरा येथे प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले. चालकाने ही बस राजकमल चौकपर्यंत चालवित आणली. त्यामधून धूर निघत असल्याची बाब एका दुचाकीस्वाराने चालकाच्या लक्षात आणून दिली. यानंतर बस थांबवून अग्निशमन दलाचा एक बंब दाखल झाला. येथे पोलीसही दाखल झाले होते. यानंतर बस अमरावती आगारात दुरुस्तीसाठी आणण्यात आली.
बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने धूर निघाला. बस गरम होत असल्याचे आधीच लक्षात आल्याने बडनेरा येथे प्रवाशांना दुसºया बसमध्ये बसवून देण्यात आले होते. बस दुरुस्तीचे काम सुरू आहे.
- एन. एस. जयस्वाल, आगार व्यवस्थापक अमरावती