अमरावती जिल्ह्यात संत्राचोरांंचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:16 AM2018-11-02T01:16:53+5:302018-11-02T11:41:13+5:30

अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा संत्राफळाकडे वळविला आहे. मध्यरात्री बागेतील फळे चोरून नेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे चमक येथे चोरट्यांंनी संत्री रस्त्यावरच टाकून पळ काढला.

Smoky | अमरावती जिल्ह्यात संत्राचोरांंचा धुमाकूळ

अमरावती जिल्ह्यात संत्राचोरांंचा धुमाकूळ

Next
ठळक मुद्देअचलपूर पोलिसांत तक्रार : चमक येथे संत्री टाकून पलायन, पोलिसांच्या गस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा संत्राफळाकडे वळविला आहे. मध्यरात्री बागेतील फळेचोरून नेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे चमक येथे चोरट्यांंनी संत्री रस्त्यावरच टाकून पळ काढला. त्याची फिर्याद पोलिसांत करण्यात आली आहे.
नायगाव ते चमक खुर्द मार्गातील छोटू ऊर्फ प्रवीण डोके यांच्या शेतातील ५० कॅरेटहून अधिक संत्री मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी तोडून रस्त्यावर आणून टाकली. सात हजार रुपयाची ही संत्री चोरून नेत असताना रस्त्याने अन्य वाहनांचा आवाज आल्याने चोरट्यांंनी तेथून पळ काढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सदर घटनेची फिर्याद सरमसपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासाला प्रारंभ केला.
परिसरात रात्री व पहाटे गस्त लावण्याची मागणी प्रहारचे बबलू चरोडे यांनी केली आहे. सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश आहे. आधीच संत्र्याचे दर कोसळल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशातच चोरट्यांनी थेट संत्राबागांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मध्यरात्री शिरतात चोर
अचलपूर शहराला लागून असलेल्या चमक, सुरवाडा नायगाव या रस्त्यावरील गावांमध्ये संत्राबागा आहेत. मध्यरात्री ते पहाटे ४ दरम्यान संत्री चोरून पळ काढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांमध्ये घरफोडी, चोरी, लुटमारीच्या घटनांनंतर काही चोरट्यांनी थेट संत्राबागांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Smoky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.