सागवान तस्करांचा वनरक्षकावर हल्ला

By admin | Published: January 13, 2016 12:16 AM2016-01-13T00:16:31+5:302016-01-13T00:16:31+5:30

पश्चिम मेळघाटातील बासपाणी येथील शेतशिवारात लपविलेले सागवान पकडण्यासाठी गेलेल्या वनरक्षकावर मंगळवारी सकाळी सागवान तस्कराने हल्ला चढविला.

Sniper attackers | सागवान तस्करांचा वनरक्षकावर हल्ला

सागवान तस्करांचा वनरक्षकावर हल्ला

Next

बासपाणी बीटमधील घटना : शेतात लपविले सागवानचे लाकूड
धारणी : पश्चिम मेळघाटातील बासपाणी येथील शेतशिवारात लपविलेले सागवान पकडण्यासाठी गेलेल्या वनरक्षकावर मंगळवारी सकाळी सागवान तस्कराने हल्ला चढविला. यात मिलिंद एम.सावंत (२८, रा. धारणी) गंभीर जखमी झाले आहे. त्याना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या महिन्यात सागवान तस्करानी वनकर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला होता. त्यामध्ये वनविभागाचे चार ते पाच कर्मचारी गंभीर झाले होते. आता दुसऱ्यादा सागवान तस्करी करणाऱ्या एका शेतकऱ्याने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. धारणीपासून सात किलोमिटर अंतरावरील बोड वनवर्तुळातील उतावली गावाजवळ हिरा भालू भिलावेकर यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात सागवान लपविलेले असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनरक्षक मिलींद सावंत व शोभासिंग हा वनमजुर भिलावेकर यांच्या शेतात कारवाई करण्याकरिता गेले होते. दरम्यान आरोपी हिरा भिलावेकर याने अचानक वनकर्मचाऱ्यांवर शेतातील वाकसाने हल्ला चढविला. या हल्यात मिलींद सावंत यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाले. हल्ला करून आरोपीने पळ काढल्यावर वनकर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी विवेक येवतकर यांना माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश गुल्हाने यांच्यासह काही वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी सावंतला तत्काळ पोलीस ठाण्यात नेऊन तेथून जवळील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अमरावती येथील इर्विन रुग्णालयात हलविण्यात आले. सावंत यांचे सिटीस्कॅन काढण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरुकरण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

Web Title: Sniper attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.