आतापर्यंत १,१९,५३४ क्विंटल बियाण्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:43+5:302021-07-12T04:09:43+5:30

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत सहा लाख हेक्टरमध्ये म्हणजेच ८० टक्क्यांवर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. याकरिता आतापर्यंत १,१९,५३४ ...

So far 1,19,534 quintals of seeds have been sold | आतापर्यंत १,१९,५३४ क्विंटल बियाण्यांची विक्री

आतापर्यंत १,१९,५३४ क्विंटल बियाण्यांची विक्री

Next

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत सहा लाख हेक्टरमध्ये म्हणजेच ८० टक्क्यांवर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. याकरिता आतापर्यंत १,१९,५३४ क्विंटल बियाण्यांची विक्री झालेली आहे. यात सर्वाधिक १.०८,७१५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा समावेश आहे.

यंदाच्या खरिपाकरिता ६.९८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. याकरिता कृषी विभागाने १,२६,७७७ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली होती. यात महाबीज ९०,३१५ व खासगी ५८,०९७ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. महाबीजचे एकूण आवंटन १५,३८० क्विंटलचे होते. त्यातुलनेत सार्वजनिक क्षेत्रातून १२,९७८, खासगी १,१३,७९९ असे एकूण १,२६,७७७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. याकरिता हेक्टरी किमान ७५ किलो बियाणे पाहिजे. यात महाबीजकडे ८५ हजार क्विंटल व खासगीत ४५,३१३ क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यातुलनेत ११,५८५ क्विंटल सार्वजनिक व सार्वजनिकमधून ९१,१९७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झालेला आहे. आतापर्यंत ज्वारीची ३८० क्विंटल, बाजरा निरंक, मका १,००० क्विंटल, मूग ३,२०० क्विंटल, उडीद ४४० क्विंटल, भुईमूग ५० क्विंटल, तीळ एक क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनची पेरणी उलटल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. बाजारात पुरेसे बियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराने बियाणे विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

३४,७३२ मे.टन खतांचा साठा शिल्लक

यंदाच्या खरिपाकरिता १,०८,८९० मेटन खतांचा साठा मंजूर करण्यात आला होता, यामध्ये एप्रिल ते जुलै महिन्यांपर्यंत ४९,९९३ मेटन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे. त्यातुलनेत जिल्ह्यात जुलैपर्यंत ४९,९९३ मेटन खतांचा पुरवठा करण्यात आला. याशिवाय मागच्या हंगामातील २३,६९० मेटन साठा डिलरकडे शिल्लक होता. त्यामुळे आतापर्यंत ७३,६८३ मेटन साठा होता. यापैकी ३८,९५१ मेटन खतांची विक्री करण्यात आल्याने सद्यस्थितीत ३४,७३२ मेटन साठा शिल्लक आहे.

बॉक्स

डीएपी, युरियाचा तुटवडा जाणवणार

जिल्हा दौऱ्यात राज्याचे कृषिमंत्र्यांनी युरियाचा बफर स्टॉक करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तसे झालेले नाही, सद्यस्थितीत जिल्ह्यात युरिया ९,१६४ मेटन, डीएपी ३,८६९ मेटन, संयुक्त खते १०,४९९ मेटन, एसएसपी ९,४५८ मेटन, अमोनियम सल्फेट ४२२ मेटन, एमओपी ७४८ मेटन व मिश्र खतांचा ५८२ मेटन साठा शिल्लक आहे. आता पावसाला सुरुवात झालेली असल्याने खतांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे युरिया व डीएपीचा तुटवडा जाणवणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: So far 1,19,534 quintals of seeds have been sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.