पॅनकार्ड क्लबविरुद्ध आतापर्यंत ५२ तक्रारी
By admin | Published: January 18, 2017 12:10 AM2017-01-18T00:10:51+5:302017-01-18T00:10:51+5:30
विविध योजनांच्या माध्यमातून गुतंवणूकदाराकडून लांखो रुपये उकळणाऱ्या पॅनकार्ड क्बलविरुद्ध आतापर्यंत ५२ जणांनी तक्रार नोंदविल्या आहेत.
२४ लाख ९३ हजारांची गुंतवणूक
अमरावती : विविध योजनांच्या माध्यमातून गुतंवणूकदाराकडून लांखो रुपये उकळणाऱ्या पॅनकार्ड क्बलविरुद्ध आतापर्यंत ५२ जणांनी तक्रार नोंदविल्या आहेत. यामध्ये ५२ तक्रारदारांकडून गुतंवणुकीच्या नावावर २४ लाख ९३ हजार रुपये पॅनकार्ड क्लबद्वारे घेण्यात आल्याचे तक्रार नमूद केले आहे.
पोलीस सूत्रानुसार, अब्दुल फारूख शेख जफर यांनी ११ आॅक्टोबर २०१६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात पॅनकार्ड क्लबविरुद्ध तक्रार नोंदविली. पॅनकार्ड क्लबमध्ये पैसे भरल्यास सहा वर्षे ३ महिन्यांत दुप्पट पैसे मिळण्याचे एजन्टकडून तक्रारकर्त्याला सांगण्यात आले. मात्र, अब्दुल फारूख यांना पॅनकार्ड क्लबतर्फे पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे अब्दुल फारूख यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. आतापर्यंत ५८ जणांनी पॅनकार्ड क्बलविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीअंती क्लबचे संचालक शोभा रत्नाकर बरडे (रा. बोरीवली), सुधीर शंकर मोरर्व्हेकर (रा. प्रभादेवी), उषा अरुण तारी (रा. माहीम), मनीष कालीदास गांधी (रा.ठाणे), चंद्रसेन गणपत भोसे(रा.सापन) व रामचद्रन रामकृष्णन (रा. मालाड, मुंबई) यांना आरोपी बनविले. (प्रतिनिधी)
मुंबई पोलिसांतही तक्रारी
पॅनकार्ड क्बलच्या फसवणूक प्रकरणाचा अमरावती पोलिसांनी भंडाफोड केल्यानंतर आता हळूहळू अन्य शहरांतील नागरिक संबंधित ठाण्यात तक्रारी नोंदवीत आहेत. मुंबई पाोलिसांकडेही पॅनकार्ड विरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या असून तेथील आर्थिक गुन्हे शाखेने तपास कार्य आरंभले आहे.